शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ठरलं! अॅपलचे आता 'मेक इन इंडिया'; भारतात सुरू केले iPhone 12 चे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:05 PM

1 / 10
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया यांची घोषणा केली होती. परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन उत्पादन करावे, यासाठी प्रोत्साहन दिले गेले. यासाठी काही योजना, धोरणे राबवण्यात आली.
2 / 10
सन २०१९ मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारत संकल्पना देशात राबवण्यास सुरुवात केली. मेक इन इंडिया संकल्पनेला प्रतिसाद देऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषतः मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी गुंतवणूक करत भारतात उत्पादन करण्यास सुरुवात केली.
3 / 10
अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव, भारताची आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाची हाक या पार्श्वभूमीवर आता दिग्गज टेक कंपनी अॅपलने (Apple) भारतात आयफोन १२ चे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.
4 / 10
भारतात आयफोन १२ चे उत्पादन सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे कपनीने आपल्या निवेदनात म्हटले असून, गुरुवारी कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. (apple officially announced that it has commenced iPhone 12 assembly in India)
5 / 10
भारतात आयफोनचे उत्पादन घेण्यासाठी अ‍ॅपलने फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. आयफोन एसई, आयफोन १०आर आणि आयफोन ११ यांचे उत्पादन भारतात सुरू असून, आता आयफोन १२ च्या उत्पादनालाही सुरूवात झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
6 / 10
नेमक्या कोणत्या पुरवठादाराकडून आयफोन १२ चे उत्पादन घेतले जात आहे, याबाबतची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, फॉक्स्कॉनच्या तामिळनाडूमधील प्रकल्पात आयफोन १२ च्या उत्पादनाला सुरूवात झाली असावी, असे म्हटले जात आहे.
7 / 10
असे असले तरी फॉक्सकॉनकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या तिमाहीत भारतात आयफोन १२ चे उत्पादन सुरू करण्यात येईल, असे अॅपलकडून जानेवारी महिन्यात सांगण्यात आले होते. यामुळे मेक इन इंडिया मोहिमेला अधिक बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
8 / 10
भारताला मोबाईल आणि घटकांच्या निर्मितीचे मोठे केंद्र बनवण्याचे आमचे प्रयत्न जगाचे लक्ष वेधून घेत आहेत हे पाहून आनंद झाला, यामुळे मोठ्या संख्येने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
9 / 10
दरम्यान, भारताकडून दिल्या जाणाऱ्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत आघाडीची अमेरिकन स्मार्टफोन निर्माता अॅपल कंपनी आयपॅडचे उत्पादनही भारतात तयार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला अॅपलच्या आयपॉडचे उत्पादन चीनमध्ये केले जाते.
10 / 10
चीनवरील अवलंबित्व कमी करून फॉक्सकॉनच्या माध्यमातून आयपॅडचे उत्पादन भारतात करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे, असे यावेळी सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या अॅपलच्या बहुतांश आयपॅडचे उत्पादन चीनमधून केले जाते.
टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञानMake In Indiaमेक इन इंडिया