व्हॉट्सअॅपवर तुम्ही सुरक्षित आहात की नाही? असे तपासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:36 AM
1 / 7 इस्त्रायलच्या पिगासस स्पायवेअर अॅटॅकमुळे गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप चर्चेत राहिले होते. या स्पायवेअरने जगभरातील पत्रकार आणि समाजसेवकांना एक मिसकॉल देऊन हेरगिरी केली होती. 2 / 7 या हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपला याची माहिती मिळाली. याच क्लुप्तीने हॅकर्स एमपी4 व्हिडीओ पाठवून तुम्हाला लक्ष्य करून माहिती चोरू शकतात. यानंतर व्हॉट्सअॅपने युजरसाठी काळजी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 3 / 7 हॅकर व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरस असलेली एमपी 4 फाईल युजरना पाठवत आहेत. ही फाईल अन्य व्हिडिओ फाईलसारखीच सुरू होते. मात्र, पाठीमागिल बाजुला हॅकर्स तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस सुरू करून मोबाईलचा ताबा घेतात. यानंतर या मोबाईलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. 4 / 7 व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, या कमतरतेनंतर कंपनीने या व्हायरस विरोधात कोडिंग केले असून नवीन अपडेट व्हर्जन लाँच केले आहे. हे व्हर्जन अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. 5 / 7 अँड्रॉईड युजरना व्हॉट्सअॅपचे कमीतकमी 2.19.274 हे व्हर्जन अपग्रेड करावे लागणार आहे. तर आयफोन युजरना 2.19.100 हे व्हर्जन अपग्रेड करावे लागणार आहे. 6 / 7 हे व्हर्जन पाहण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हेल्पमध्ये अॅप इन्फो हा पर्याय आहे. 7 / 7 यामध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअॅपचे व्हर्जनचा नंबर दिसतो. हा नंबर 2.19.274 पेक्षा जास्त असायला हवा. सध्याची अपडेट 2.19.347 ही आहे. आणखी वाचा