तुम्ही इयरफोन वापरताय? तर हे वाचायलाच हवं! By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:13 PM
1 / 8 कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात... 2 / 8 संभाव्य समस्या इयरफोनच्या अतिवापरामुळे श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, निद्रानाश, डोकेदुखी, कानात शिट्टी वा अन्य आवाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 3 / 8 ऐकण्याची क्षमता सतत इयरफोन वापरल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ऐकायला कमी येणे ही गंभीर समस्या आहे, त्यामुळे कानाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. 4 / 8 गरज असेल तरच - फक्त चांगल्या दर्जाचे इयरफोन वापरा. 5 / 8 इयरफोनऐवजी स्पीकर किंवा हेडफोन वापरण्यास प्राधान्य द्या. 6 / 8 सतत इयरफोन कानांत घालून ठेवण्यापेक्षा, दर अर्ध्या तासानंतर १० ते १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. 7 / 8 कानात खाज येणे, दुखणे किंवा इतर समस्या असल्यास डॉक्टरांची भेट घ्या. 8 / 8 सध्याच्या काळात डिजिटल मीडियात वापरताना इयरफोन ही गरज बनली आहे, मात्र त्याचे शरीरावर परिणाम होतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे आणखी वाचा