गेमर्ससाठी गुड न्यूज! १६ जीबी रॅमसह Asus ROG Phone 5 'या' दिवशी होणार लॉन्च
By देवेश फडके | Updated: February 9, 2021 18:48 IST
1 / 8नवी दिल्ली : आताच्या घडीला बदलत्या वेगवान तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन्समध्येही उत्तोमत्तम फिचर्स येऊ लागले आहेत. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्याकडून कमी किमतीत जास्त फिचर्स देण्यात चढाओढ लागली आहे. 2 / 8भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक चायनीज अॅप बंद केल्यानंतर देशभरातून चायनीज प्रोडक्ट्सना विरोध होऊ लागला. याचा फायदा बिगर चायनीज कंपन्यांना झाल्याचे पाहायाला मिळत आहे. 3 / 8गेमिंगसाठी खास तयार केलेल्या Asus ROG Phone या स्मार्टफोनचे पाचवे व्हर्जन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनला TENAA आणि 3C सर्टिफिकेट मिळाले आहे. 4 / 8 Asus ROG Phone 5 स्मार्टफोनचे काही फिचर्सही लीक झाले आहेत. Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन ASUS_I005DA या नावाने लिस्टेट झाला आहे. तसेच या गेमिंग स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 888 चा प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे समजते. 5 / 8Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर काम करेल. गेतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात Asus ROG Phone या गेमिंग स्मार्टफोनचे ८ जीबी व्हेरियंट गीकबेंचवर दिसले होते. 6 / 8Asus ROG Phone 5 या गेमिंग स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात येणार असून, 6000mAh ची बॅटरी असेल. इतकेच नाही, तर या स्मार्टफोनसोबत ६५ व्हॉटचा रॅपिड चार्जरही कंपनीकडून देण्यात येणार आहे. 7 / 8Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनच्या बॅक साइलाही डिस्प्ले देण्यात आल्याचे समजते. Asus ROG Phone चे मागील दोन स्मार्टफोन्स गेमर्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. तसेच Asus ROG Phone 3 या मॉडेलचीही गेमर्सना उत्सुकता लागून राहिली होती. Asus ROG Phone 3 नंतर आता कंपनीने थेट Asus ROG Phone 5 हा स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 / 8Asus कंपनीकडून ROG Phone 5 च्या लॉन्चिंगची अधिकृत घोषणा केली नसली, तरी काही साइट्सवरील माहिती आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार १२ फेब्रुवारीनंतर हा गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.