शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

By सिद्धेश जाधव | Published: January 07, 2022 6:52 PM

1 / 6
ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढली आहे. किराणा दुकानदार, भाजीचा स्टॉल असो किंवा शॉपिंग मॉल, सध्या सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटचा पर्याय मिळतो. परंतु कोड स्कॅन करून तात्कळ पेमेंट करण्याच्या घाईत अनेक चुका होऊ शकतात. पुढे आम्ही अशाच चुकांची माहिती दिली आहे.
2 / 6
तुमचं UPI अकॉउंट/अ‍ॅड्रेस सुरक्षित ठेवणे महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा युपीआय आयडी/अ‍ॅड्रेस शेयर करू नका. लक्षात घ्या यूपीआय अ‍ॅड्रेस तेव्हा द्यावा लागतो जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून त्यांना हवी ती अमाऊंट असलेलं पेमेंट हवं असतं.
3 / 6
जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा कोणतंही पेमेंट अ‍ॅप वापरत असाल तर तुमच्या स्मार्टफोनचा पासवर्ड देखील स्ट्रॉन्ग असावा.
4 / 6
अनोळखी लिंकव्हर क्लिक करणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. हॅकर्स लिंक शेयर करतात किंवा कॉल करतात आणि व्हेरिफिकेशनसाठी एक थर्ड-पार्टी अ‍ॅप डाउनलोड करायला सांगतात. कधीही अशी लिंक ओपन करू नये किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करू नये.
5 / 6
रिवॉर्डस आणि कॅशबॅकच्या मोहापायी आपण अनेक पेमेंट्स अ‍ॅप इन्स्टॉल करतो. कालांतराने काही अ‍ॅप्स वापरले जात नाहीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा निरुपयोगी आणि अपडेट न केलेल्या अ‍ॅप्सचा फायदा मालवेयर डेटा मिळवण्यासाठी करू शकतात. त्यामुळे एकच विश्वासू पेमेंट अ‍ॅप वापरा.
6 / 6
UPI पेमेंट अ‍ॅप नव्हे तर तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि स्मार्टफोन मधील इतर अ‍ॅप्स देखील अपडेटेड असावेत. अपडेटमध्ये बग फिक्स मिळतात त्यामुळे तुमचं अकॉउंट अधिक सुरक्षित होतं.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान