जबरदस्त! BGMI-Free Fire चं साम्राज्य धोक्यात; 'या' आगामी मोबाईल गेम्सचं रजिस्ट्रेशन सुरु जोरात सुरु
By सिद्धेश जाधव | Updated: April 25, 2022 19:03 IST
1 / 6अनेकांना पबजी, बीजीएमआय खेळून कंटाळा आला आहे. अशा गेमर्ससाठी लवकरच काही मोबाईल गेम्स येत आहेत. हे गेम्स लाँच होण्याआधीच लोकप्रिय ठरत आहेत. पुढे यातील टॉप 5 मोबाईल गेम्सची माहिती आम्ही दिली आहे. 2 / 6बहुप्रतीक्षित Apex Legends Mobile चं प्री-रजिस्ट्रेशन गुगल प्ले स्टोरवर सुरु करण्यात आलं आहे. हा पबजी आणि फ्री फायर प्रमाणे एक बॅटल रॉयल गेम आहे. ज्यात विविध गन्स आणि रायफल्सचा वापर करता येईल. 3 / 6Battlefield Mobile चं अर्ली अल्फा टेस्टिंग सुरु आहे. तसेच गुगल प्ले स्टोरवर रजिस्ट्रेशन देखील सुरु झालं आहे. या फर्स्ट पर्सन शूटर गेममध्ये Call of Duty Mobile सारखे अनेक गेम मोड मिळतील. 4 / 6Diablo Immortal एक नवीन रोल प्लेयिंग गेम (RPG) आहे, जो Diablo II: Lord of Destruction आणि Diablo III इव्हेंटच्या दरम्यान सेट आहे. Blizzard Entertainment निर्मित या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन गुगल प्ले स्टोरवर सुरु झालं आहे. 5 / 6Harry Potter: Magic Awakened एक रोल प्लेयिंग गेम आहे जो कार्ड कलेक्शन स्वरूपात सादर करण्यात येईल. जर तुम्ही ‘पॉटर हेड’ असाल तर तुम्ही या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करू शकता. 6 / 6League of Legends: Wild Rift चं प्री-रजिस्ट्रेशन गुगल प्ले स्टोरवर सुरु झालं आहे. हा एक प्रसिद्ध व्हिडीओ गेम आहे, ज्याचं मोबाईल व्हर्जन आता येत आहे. हा एक 5v5 मोबाईल आहे.