शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

20 हजारांच्या बजेटमध्ये कोणता 5G स्मार्टफोन घ्यावा? ‘या’ बेस्ट हँडसेटमधून करा एकाची निवड

By सिद्धेश जाधव | Published: April 19, 2022 5:45 PM

1 / 5
Redmi Note 11T 5G चे तीन व्हेरिएंट आले आहेत. 6GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 6.6 इंचाचा FHD+ 90Hz डिस्प्ले असलेला हा फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो.
2 / 5
Poco M4 Pro 5G स्मार्टफोन भारतात 4GB/64GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. बेस मॉडेल 15,999 रुपयांमध्ये मिळेल. फोनमध्ये Mediatek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी आहे.
3 / 5
Realme Narzo 30 Pro 5G च्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,049 रुपये आहे. फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह देखील विकत घेता येईल. यात 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 800U प्रोसेसर, 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
4 / 5
Infinix Zero 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 6.78 इंचाचा 120Hz डिस्प्ले, 5000mAh ची बॅटरी आणि 48MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे.
5 / 5
Moto G71 5G च्या एकमेव 6GB RAM व 128GB इंटरनल मेमरी मॉडेलची किंमत 19,099 रुपये आहे. फोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह देण्यात आला आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल