शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रिकेट बघून कंटाळा आला? मग ‘हे’ 7 बेस्ट क्रिकेट गेम्स डाउनलोड करून मारा 6 चेंडूत 6 सिक्स

By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 5:02 PM

1 / 7
World Cricket Championship 3 (WCC3) मध्ये वास्तववादी क्रिकेट खेळता येतं. यात चांगले कंट्रोल्स, कॉमेंट्री, आणि मल्टीप्लेयर सपोर्ट मिळतो. यात रियल टाइम मोशन कॅप्चर आणि कस्टम स्टेडियम्सचं फिचर मिळतं. हा फ्री गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
2 / 7
Sachin Saga Cricket Champions मध्ये तुम्हाला सचिन तेंडुलकर प्रमाणे वयाच्या 16 व्या वर्षांपासून खेळण्याची संधी मिळते. तो जिथे जिथे खेळाला त्या सर्व स्टेडियम्समध्ये तुम्हाला खेळात येतं. यात वन डे, टी20, टेस्ट, प्रीमियर लीग, डोमेस्टिक आणि वर्ल्ड कप असे मोड आहेत. हा गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
3 / 7
Real Cricket 20 मध्ये रियल टाइम मल्टीप्लेयर गेम्स खेळता येतात. इथे तुम्ही 1v1, 2v2 आणि co-op किंवा मित्राची मॅच देखील बघू शकता. गेममधे तुम्ही तुमच्या बॅटिंगची शैली निवडू शकता. यातील क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये तुम्ही क्रिकेट टीम बनवण्यासाठी ऑक्शनमध्ये देखील सहभागी होऊ शकता. हा फ्री गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
4 / 7
World Cricket Battle 2 मध्ये करियर मोड, टी20 क्रिकेट लीग आणि रियल टाइम बॅटिंग मल्टीप्लेयर मोड मिळतात. यात देखील टी20 क्रिकेट प्रीमियर लीग औक्षण आहे, जिथे तुम्ही फ्रॅन्चायजीचे मालक बनू शकता. हा गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवरून डाउनलोड करता येईल.
5 / 7
CSK Battle of Chepauk 2 मध्ये तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचे मालक म्हणून खेळता. इथे तुम्ही तुमची स्वतःची टीम निवडू शकता. यात खास PvE आणि PvP मोड देण्यात आले आहेत. मल्टीप्लेयर मोडमध्ये पाच लोकांना खेळता येतं. CSK Battle of Chepauk 2 गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
6 / 7
Stick Cricket Live हा एक 1v1 मल्टीप्लेयर गेम आहे, ज्यात जगभरातील अनेक स्टेडियम्स आहेत. यातील बॅटिंग टेस्टमध्ये तुम्ही विविध प्रकारचे शॉट्स खेळू शकता. Stick Cricket Live हा फ्री गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
7 / 7
Stick Cricket Live हा एक 1v1 मल्टीप्लेयर गेम आहे, ज्यात जगभरातील अनेक स्टेडियम्स आहेत. यातील बॅटिंग टेस्टमध्ये तुम्ही विविध प्रकारचे शॉट्स खेळू शकता. Stick Cricket Live हा फ्री गेम गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान