Best Fighting Games Available On Android
‘हे’ आहेत WWE सारखे अँड्रॉइडवरील बेस्ट फायटिंग गेम्स By सिद्धेश जाधव | Published: March 28, 2022 7:38 PM1 / 6काही दिवसांपूर्वी WWE 2k22 गेम लाँच झाला आहे. यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा गेम PC, PS4, PS5, Xbox Series X|S आणि Xbox One कन्सोलवर उपलब्ध झाला आहे. परंतु असाच अनुभव तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलवर हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी अँड्रॉइडवरील बेस्ट फायटिंग गेम्सची यादी घेऊन आलो आहोत. 2 / 6WWE Mayhem हा एक आर्केड ऍक्शन गेम आहे. तुम्ही जॉन सीना, बेकी लिंच, द रॉक, अंडरटेकर इत्यादी सुपरस्टार्सच्या रूपात खेळू शकता. प्रत्येक सुपरस्टारच्या सिग्नेचर मुव्ह्ज देखील या गेममध्ये मिळतात गेमयामध्ये WWE च्या रेसलिंग प्रमाणे Weekly RAW, SmackDown आणि NXT असे मोड देखील मिळतात. या गेममध्ये तुम्ही तुमचा सुपरस्टार देखील बनवू शकता. 3 / 6EA Sports UFC Mobile 2 मध्ये MMA फायटिंगचा अनुभव स्मार्टफोनवर मिळतो. इथे तुम्ही लेजेंडरी फायटर्स गोळा आणि अपग्रेड करू शकता. लेव्हल केल्यावर त्यांची क्षमता आणि कौशल्य बदलत जातात. 4 / 6WWE Mayhem प्रमाणे WWE Undefeated देखील एका आर्केड रेस्टलिंग गेम आहे. परंतु यात रोल प्लेयिंग गेमची छटा आहे. तुम्ही तुमच्या मूव्हज स्वतः कस्टमाइज करू शकता, जेणेकरून तुम्ही शत्रूला हरवू शकता. रेस्टलिंगच्या बाहेत देखील अनेक अॅरेना या गेममध्ये मिळतात. 5 / 6Mortal Kombat मध्ये 130 लोकप्रिय पात्र आहेत. ज्यातील तीन पात्रांचा तुम्ही संघ देखील बनवू शकता. हा गेम कन्सोल आणि पीसीचा अनुभव मोबाईलवर मिळवून देतो. 6 / 6Shadow Fight 3 एक लोकप्रिय मोबाईल फायटिंग गेम आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या निंजांसोबत लढा देता. यात विविध हत्यारं अनलॉक करता येतात, जे तुमची ताकद वाढवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications