Best password managers android compared
हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स By सिद्धेश जाधव | Published: February 08, 2022 7:58 PM1 / 8मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन वावर वाढल्यामुळे सर्व गोष्टींसाठी पासवर्ड असणं आवश्यक आहे. परंतु एवढे पासवर्डस लक्षात ठेवणं देखील कठीण काम आहे. अशा वेळी पासवर्ड मॅनेजर मदत करतो. 2 / 8अँड्रॉइडमध्ये बिल्ट-इन पासवर्ड मॅनेजर आहे परंतु तो सर्वच गोष्टी करू शकत नाही. प्ले स्टोरवर देखील अनेक अॅप्स मिळतील पण ते सुरक्षित असतीलच असं नाही, म्हणून आम्ही तुमच्यासाठी अँड्रॉइडवरील बेस्ट पासवर्ड मॅनेजर्सची यादी घेऊन आलो आहोत. 3 / 81Password हा बेस्ट पासवर्ड मॅनेजर्स पैकी एक आहे. यात पासवर्ड शेयरिंग, पासवर्ड ब्रीच मॉनिटरिंग, ट्रॅव्हल मोड आणि 2FA फिचर मिळतात. 4 / 8Dashlane एक फ्री आणि लोकप्रिय पासवर्ड मॅनेजर आहे. हा कमकुवत पासवर्ड डिटेक्ट करतो. सोबत तुम्हाला VPN ची सुरक्षा देखील मिळते. तुमचा पासवर्ड डार्क वेबवर लीक झाला कि नाही हे देखील डेटा ब्रीच मॉनिटरिंगमधून समजते. 5 / 8LastPass एक जुना अँड्रॉइड पासवर्ड मॅनेजर आहे. इथे तुम्ही अमर्याद पासवर्डस सेव्ह करून ठेऊ शकता. हा तुमचे पासवर्डस स्कॅन करून कमकुवत आणि पुन्हा पुन्हा वापरलेले गेलेले पासवर्ड डिटेक्ट करतो. 6 / 8Enpass मध्ये अन्य मॅनेजर्स प्रमाणे सुरक्षा मिळते, परंतु यात तुम्ही तुमचा डेटा Google Drive, Dropbox किंवा अन्य क्लाउड सर्व्हिसेसवर स्टोर करून ठेऊ शकता. 7 / 8Bitwarden हा ओपन सोर्स किफायतशीर पासवर्ड मॅनेजर आहे, जो सर्वाधिक सुरक्षा देतो. इथे तुम्ही अमर्याद पासवर्ड, खाजगी आणि आर्थिक माहिती सेव्ह करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या सर्वर देखील पासवर्डस साठवून ठेऊ शकता. 8 / 8Keeper एक जुना पासवर्ड मॅनेजर आहे परंतु याला वेळेवर अपडेट मिळतात. यात डेटा ब्रीच मॉनिटरिंग फिचर मिळते. सोबत अनेक चांगले चांगले फिचर मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications