Beware! Charging mobile in public? Then you can become a victim of 'juice jacking'
सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 1:33 PM1 / 6सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे मोबाइल चार्ज केल्यानंतर हैदराबादमधील एका कंपनीच्या सीईओच्या खात्यातून तब्बल १६ लाख रुपये नकळत काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ओडिशा पोलिसांनीही सार्वजनिक ठिकाणी मोबाइल फोन चार्जिंग करू नका, असे आवाहन केले आहे. तुमच्यासोबतही असा प्रकार होऊ शकतो. वेळीआधीच सावध होत अशा घटना टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ...2 / 6हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या यूएसबी चार्जिंग पोर्टद्वारे गुन्हेगार कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा अन्य उपकरणात मालवेअर बसवून वैयक्तिक डेटा चोरतात. या प्रक्रियेला ‘ज्यूस जॅकिंग’ म्हणतात.3 / 6 चार्जिंग पॉइंट दाेन प्रकारचे असतात. एक एसी पॉवर सॉकेट आणि यूएसबी टू यूएसबी चार्जिंग पॉइंट. यूएसबी चार्जिंग पॅाइंटमध्ये थेट यूएसबी केबल लावून मोबाइल चार्ज करता येतो. यात यूएसबीतून डेटाही ट्रान्सफर होतो. यातून डेटा चोरीही होऊ शकतो. जेव्हा आपण यापासून मोबाइल चार्ज करत असतो त्यावेळी मोबाइलमधून डेटा हॅकर्सकडे थेट ट्रान्सफर होतो. यात आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.4 / 6 लक्षात ठेवा : एसी पॉवर सॉकेटद्वारे डेटा ट्रान्सफर किंवा चोरीची समस्या नाही. चार्जरद्वारे तुमच्या मोबाइलसोबत डेटा कम्युनिकेशन करता येत नाही, मात्र थेट यूएसबी ते यूएसबीद्वारे डेटा ट्रान्सफर करता येतो.5 / 6नक्की काय काळजी घ्याल? रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा विमानतळ या सारख्या सार्वजनिक ठिकाणी अनोळखी यूएसबी केबलने मोबाइल चार्ज करू नका. पॉवर बँक घेऊन प्रवास करा. त्यामुळे तुम्ही कुठेही आणि कधीही आपला फोन चार्जिंग करू शकता. फुकट मिळतेय म्हणून अनोळखी ठिकाणचे वायफाय कनेक्ट करू नका. यामुळेही मोबाइल हॅक होतो.6 / 6प्रवास करताना तुमच्याकडे दोन फोन असतील तर ते दोन्हीही चार्जिंग करूनच घराबाहेर पडा. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी प्लग असेल तर स्वत:च्या अडॅप्टरने मोबाइल चार्जिंग करा. अनोळखी व्यक्तीच्या लॅपटॉप अथवा काॅम्प्युटर केबलने आपला मोबाइल चार्ज करण्याची चूक कधीही करू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications