beware of digital arrest scam if your bank account have no money
सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:16 PM1 / 12डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. सायबर क्रिमिनल्स हे लोकांच्या नावावर बँकेतून पर्सनल लोन घेतात. त्यानंतर ते पैसे मिळताच त्यावर डल्ला मारतात आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करतात. 2 / 12बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते. सध्या याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅम काय आहे ते जाणून घेऊया... डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये, एखाद्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो.3 / 12कॉलवर सांगितलं जातं की, तुमच्या नावाने एक पार्सल परदेशात जात होतं, ज्यामध्ये ड्रग्ज सापडले आहेत किंवा तुमच्या मोबाईलचा, बँक अकाऊंटचा वापर हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केला गेला आहे. मात्र हा फोन आपल्याला जाळ्यात अडकवण्यासाठी असतो.4 / 12बनावट पोलीस यानंतर सीबीआय किंवा अन्य सरकारी यंत्रणांचं नाव वापरून फेक अरेस्ट वॉरंटही दाखवतात. यानंतर घरामध्ये कॅमेऱ्यासमोर राहण्याच्या सूचना देण्यात येतात. यालाच डिजिटल अरेस्ट असं म्हणतात. 5 / 12सायबर ठग डिजिटल अटक करून तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि इतर माहिती मिळवतात. यानंतर, ते तुमच्या नावावर सहजपणे पर्सनल लोन घेऊ शकतात, ज्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येते आणि नंतर ते तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात.6 / 12डिजिटल अरेस्टदरम्यान, पोलीस, सीबीआय किंवा इतर कायदेशीर एजन्सी तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलवर येण्यास सांगू शकतात. या काळात, ते तुम्हाला तुमची मोबाइल स्क्रीन शेअर करण्यास देखील सांगू शकतात, त्यानंतर ते तुमच्या मोबाइलवर होणारी प्रत्येक एक्टिव्हिटी सहजपणे पाहू शकतात.7 / 12स्क्रीन शेअरिंग दरम्यान, जर तुम्हाला बँकेकडून ओटीपी मिळत असेल, तर स्क्रीन शेअरिंगमुळे ते तुमच्या ओटीपी एक्सेस करू शकतात. तुमच्या बँक खात्यात जास्त रक्कम नसेल तर ते तुमच्या नावावर पर्सनल लोन घेऊ शकतात.8 / 12भारतात अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला काही लाख रुपयांचं कर्ज देतात. अशा परिस्थितीत, तुम्ही फक्त काही क्लिक करून आणि एक OTP देऊन घरबसल्या पर्सनल लोन मिळवू शकता. सायबर क्रिमिनल्स या सेवेचा फायदा घेतात.9 / 12सायबर क्रिमिनल्स लोकांच्या नावे फेक पर्सनल लोन वगैरे घेण्यासाठी क्रेडिट कार्डांनाही लक्ष्य करू शकतात. त्याच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढता येतात.10 / 12सायबर फसवणुकीची सुरुवात अनोळखी नंबरवरून येणारे कॉल, मेसेज किंवा लिंक्सपासून होते. म्हणूनच, नेहमी लक्षात ठेवा की तुमचा OTP, बँक डिटेल्स आणि पर्सनल माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका.11 / 12सायबर क्रिमिनल्स इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्यात लॉग इन करू शकतात. त्यानंतर तेथून लाखो रुपयांचे व्यवहार होऊ शकतात.12 / 12तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कोणतीही संशयास्पद एक्टिव्हिटी आढळल्यास, ते नेमकं काय आहे हे लगेचच चेक करा. अनेक वेळा एक-दोन रुपये कट होणं देखील महागात पडू शकतं. त्याच्या माध्यमातून सायबर क्रिमिनल्स लाखो रुपयांवर डल्ला मारू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications