Big news! Apple's biggest factory to open in India soon, says union minister ashwini vaishanav
मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:55 PM1 / 8 Apple iPhone in India: जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलेला भारत आता चीनला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. आयफोन निर्माता Apple आता भारतात आपला सर्वात मोठा कारखाना उघडणार आहे.सध्या Appleचा सर्वात मोठा कारखाना चीनमधील झेंगझोऊ येथे आहे. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मंगळवारी ही माहिती दिली.2 / 8 अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अॅपल आयफोनचे (Apple iPhone) भारतातील सर्वात मोठे उत्पादन युनिट (Manufacturing Unit) बंगळुरूमधील होसूरजवळ सुरू होणार आहे. यामध्ये 60,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळेल. हा प्लांट सुरू झाल्याने रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील आणि या परिसराचा विकासही होईल.3 / 8 अश्विनी वैष्णव यांनी आदिवासी गौरव दिन सोहळ्यात बोलताना सांगितले की, रांची आणि हजारीबागच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 6,000 आदिवासी महिलांना आयफोन बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.4 / 8 या आदिवासी महिला अॅपलच्या या नवीन कारखान्यात नोकरी मिळवण्यात आघाडीवर असतील. हा कारखाना बनवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.5 / 8 बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, अॅपलने आयफोन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्सला (Tata Electronics) आउटसोर्स केले आहे. 6 / 8 टाटांच्या या कंपनीचा होसूर येथे प्लांट आहे. देशात आयफोनची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स दिग्गज फॉक्सकॉन(Foxconn), विस्ट्रॉन (Wistron) आणि पेगाट्रॉनद्वारे(Pegatron) केली जाते.7 / 8 भारतात तयार होणाऱ्या अॅपल आयफोन प्लांटमधील कर्मचाऱ्यांची संख्या चीनमधील प्लांटपेक्षा कमी असू शकते. पण कंपनीची भारताकडे वाटचाल आणि येथे सर्वात मोठा कारखाना सुरू करण्याची ही योजना महत्वाची आहे.8 / 8 चीनला मागे टाकण्याच्या भारताच्या तयारीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. सध्या चीनमधील झेंगझोऊच्या फॉक्सकॉन प्लांटमध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी काम करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications