big News from EPFO to 64 lakh pensioners; Submit a Life Certificate in one click hrb
64 लाख पेन्शनधारकांना EPFO ची खूशखबर; घरबसल्या जमा करा हा दाखला By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 7:53 PM1 / 12नोकरी झाल्यानंतर ईपीएफओची पेन्शन सुरू होते. मात्र, या पेन्शनसाठीही खूप झगडावे लागते. जवळपास सहा महिने ते वर्ष वर्ष भर ईपीएफओच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. 2 / 12जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओकडून पेन्शनचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यामुळे बँक किंवा ईपीएफओमधील कार्यालयाच्या दरवर्षी माराव्या लागणाऱ्या चकरा वाचणार आहेत.3 / 12ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागतात. 4 / 12तुम्ही हयात आहात की नाही, याचा पुरावा बँकांकडे दरवर्षी द्यावा लागतो. अन्यथा पेन्शन बंद केली जाते. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक परंतू वयोवृद्धांना बँकांचे हेलपाटे मारणे खूपच त्रासदायक असते. बऱ्याचदा त्य़ांना आज नको उद्या या, असेही सांगितले जाते. 5 / 12तोपर्यंत साठविलेली जमापूंजीच वापरावी लागते. यानंतर पेन्शन सुरू झाली की हायसे वाटते. पण दरवर्षी एक उपद्व्याप करावाच लागतो. 6 / 12मात्र, ईपीएफओने या पेन्शनधारकांची अडचण ओळखली आहे. ईपीएफओने हयात असल्याचे सर्टिफिकेट ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. 7 / 12यासाठी वयोवृद्ध टेक्नोसेव्ही नसले तरीही घरातील व्यक्तीच्या मदतीने ते हा दाखला अपलोड करू शकतात. 8 / 12देशभरातील जवळपास 64 लाख लोकांना दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यामुळे ईपीएफओच्या नव्या सुविधेचा या लोकांना फायदा होणार आहे. 9 / 12दाखला अपलोड केल्यानंतर ही मुदत वर्षभराची असते. मग पुन्हा नवा हयातीचा दाखला द्यावा लागणार आहे. दरवर्षी हा दाखला अपलोड करण्याचे बंधनकारक आहे. 10 / 12जर हा दाखला दिला नाही तर पेन्शन रोखण्यात येते. यानंतर पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. यामुळे हा त्रास वाचणार आहे.11 / 12जर हा दाखला दिला नाही तर पेन्शन रोखण्यात येते. यानंतर पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. यामुळे हा त्रास वाचणार आहे.12 / 12ईपीएफओ मोठ्या गतीने डिजिटल सेवा पुरवित आहे. यासाठी युएएन नंबर आणि मोबाईल नंबर ईपीएफओकडे असणे गरजेचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications