Apple युजर्सना मोठा धक्का! iPhone 16e लॉन्च झाल्यानंतर कंपनीने हे 3 मॉडेल बंद केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:40 IST
1 / 6 Apple : टेक जायंट Apple ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, iPhone 16e लॉन्च केला आहे. हा नवीन फोन लॉन्च झाल्यानंतर कंपनीने अधिकृतपणे आपल्या iPhone चे 3 मॉडेल बंद केले आहेत. 2 / 6 या यादीमध्ये iPhone SE, iPhone 14 आणि iPhone 14 Plus चा समावेश आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर 16e, Apple कडून विकला जाणारा सर्वात स्वस्त आयफोन आहे.याआधी iPhone SE 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त iPhone होता. 3 / 6 16 सीरीज लॉन्च केल्यानंतर Apple ने स्पष्ट केले होते की, ते लवकरच iPhone 14 आणि iPhone 14 Plus बंद करणार आहेत. यानंतर iPhone SE 3 देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे कारण म्हणजे, हे तीनच स्मार्टफोन Lightning पोर्टसह बाजारात असलेले iPhone होते. आता अॅपलच्या सर्व मॉडेलमध्ये USB Type-C मिळते.4 / 6 नवीन 16e चा कॅमेरा कसा आहे? फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने iPhone 16e मध्ये एकच 48MP कॅमेरा दिला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा मिळेल.5 / 6 फोनमध्ये स्टिरीओ स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC आणि GPS सपोर्ट सारख्या सुविधा आहेत. या फोनमध्ये ॲपलचा इमर्जन्सी एसओएस वाया सॅटेलाइट सपोर्टही देण्यात आला आहे.6 / 6 iPhone 16e ची किंमत- iPhone 16e मध्ये 6.1-इंचाची OLED स्क्रीन आहे. हे iPhone 16 सारख्या A18 चिपसेटने सुसज्ज असेल. भारतात iPhone 16e च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये ठेवण्यात आली आहे.