शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! ब्लूटूथचा वापर करताय? मग जरा जपून; 'हे' आहेत धोके, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 7:54 PM

1 / 9
टेक्नॉलॉजीचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. अशातच सर्वजण सातत्याने नवनवीन गॅजेट्स आणि डिव्हाईसचा वापर करतात. ब्लूटूथ देखील यातीलच एक आहे. ज्याचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो.
2 / 9
ब्लूटूथ वायरलेस कनेक्टिव्हिटी या सुविधेचा वापर वाढला आहे. दोन डिव्हाईस जोडण्यासाठी याची मोठी मदत होते. सुविधा असणारी अनेक उत्पादनं कंपन्यांनी बाजारात आणली आहेत. स्मार्टफोन, टीव्ही, होम थिएटर, हेडफोन यांसह अनेक उपकरणांचा यात समावेश आहे.
3 / 9
ब्लूटूथच्या साहाय्याने स्कॅमर्स फोनमध्ये एन्ट्री करून डेटा चोरी करू शकतात. त्यामुळे काही गोष्टीचे भान युजर्सना ठेवावे लागणार आहे. ब्लूटूथ सक्षम डिव्हाईसवर कशाप्रकारे अटॅक केला जाऊ शकतो हे जाणून घेऊया.
4 / 9
ब्लूजॅकिंग - ब्लूजॅकिंग हा एक प्रकारचा सायबर अटॅक आहे. ज्यामध्ये स्कॅमर्स ब्लूटूथ सक्षम डिव्हाईसवर नको असलेले मेसेज आणि फाईल्स पाठवतात. यामुळे प्रायव्हसीला धोका निर्माण होतो. स्कॅमर्सना तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा एक्सेस मिळतो.
5 / 9
ब्लूस्नार्फिंग - यात स्कॅमर्स ब्लू टूथ प्रोटोकॉलमधील पळवाटा शोधून डिव्हाइसमधील डेटा, कॉन्टॅक्ट्स, फोटो, मेसेज आणि मल्टिमीडिया फाइल्स यांचा एक्सेस मिळवू शकतात. युजर्सना याची कल्पनाही नसते.
6 / 9
ब्लूबगिंग - अशा प्रकारच्या हल्ल्यात हॅकर्स ब्लू टूथच्या साहाय्याने शिरकाव करून फोनवर पूर्णपणे कंट्रोल मिळवतात. युजरची परवानगी न घेता फोनवरून कॉल केले जाऊ शकतात, मेसेज पाठवले जाऊ शकतात.
7 / 9
डिनायल ऑफ सर्व्हिस - ब्लू टूथ सक्षम डिव्हाइस अशा हल्ल्यांसाठी संवेदनशील असतात. अनेक कनेक्शन रिक्वेस्ट, चुकीच्या डेटा डिव्हाईसमध्ये असल्याने ते सामान्यपणे काम करू शकत नाही, त्यातील सिस्टीम क्रॅश होऊ शकते.
8 / 9
दीर्घकाळ गाणी ऐकल्याने स्मरणशक्ती कमी होण्याची भीती असते. वायरलेस हेडफोन्स, इअरफोन्स, इअरबड्स आदीचा जास्त काळ वापर केल्यास त्यामधून बाहेर पडणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
9 / 9
जाणकारांच्या मते, लहान इअरफोन्स आणि इअरबडस खूप धोकादायक असतात. त्यातून बाहेर पडणारी रेडिएशन्स कान आणि मेंदू अशा दोन्हींना हानी पोहोचवतात. त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य