शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL ची 4G सेवा केव्हा सुरू होणार?; मोदी सरकारनं संसदेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:16 PM

1 / 10
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडचं (BSNL) खासगीकरण होणार नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.
2 / 10
याशिवाय BSNLची 4G सेवा पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये सुरू होतील, अशी माहिती सरकारकडून संसदेत देण्यात आली. बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी लेखी स्वरूपात याचं उत्तर दिलं.
3 / 10
BSNL नं १ जानेवारी २०२१ रोजी आगामी 4G टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय कंपन्यांकडून प्रायर रजिस्ट्रेशन / प्रुफ ऑफ कॉन्सेप्टसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले होते.
4 / 10
BSNL च्या रिव्हायवल प्लॅनसाठी केंद्र सरकारनं दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती. याअंतर्गत, टेलिकॉम कंपनीला बजेट वाटपाच्या माध्यमातून 4G सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या प्रशासकीय वाटपाचा समावेश आहे.
5 / 10
तसंच त्यांनी यावेळी आणखी एका प्रश्नाचं लेखी उत्तर दिलं. दूरसंचार विभागाची देशातील इंटरनेट शटडाऊनला रेग्युलेट करण्यासाठी कोणताही कायदा तयार करण्याची योजना नसल्याचं त्यांनी लेखी उत्तराद्वारे म्हटलं.
6 / 10
देशात 5G सेवांची सुरूवात झाल्यानंतर 2G सेवा बंद होणार का या शक्यतांना त्यांनी नकार दिला.
7 / 10
देशात ज्या कंपन्यांना लायसन्स देण्यात आले आहेत ते 2G, 3G आणि 4G सेल्युलर सेवांसाठी आहेत. परंतु हे टेलिकॉम कंपन्यांवर अवलंबून आहे की त्यांनी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा प्रदान करावी.
8 / 10
सध्या देशात 2G, 3G आणि 4G या तंत्रज्ञानाद्वारे किंवा त्यांच्या कॉम्बिनेशनद्वारे ग्राहकांना वॉईस आणि डेटा सेवा उपलब्ध करून दिली जाते.
9 / 10
BSNLआणि MTNL या दोन्ही कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये ६९ हजार कोटींची योजना जाहीर करण्यात आली होती.
10 / 10
यामध्ये कर्मचाऱ्यांवरील वेतन खर्च कमी करणे, स्वेच्छा निवृती योजना, फोर जी सेवेसाठी आर्थिक तरतूद आणि कर्ज कमी करण्यासाठी सार्वभौम रोखे जारी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternetइंटरनेटBSNLबीएसएनएलParliamentसंसद