bsnl offers data plans along with long validity free calling and more benefits check all details
अजूनही वर्क फ्रॉम होम करताय? फक्त ७ ₹च्या खर्चात ‘ही’ कंपनी देतेय डेली ५ जीबी डेटा; फ्री कॉल्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 5:32 PM1 / 9कोरोना संकटकाळापासून जगभरातील अनेकविध कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले. कोरोनाचे संकट काही प्रमाणात ओसरल्यानंतर पुन्हा एकदा कंपनीत जाऊन काम करण्यास सुरुवात केली. 2 / 9मात्र, कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट जगात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर परत अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले. भारतातही अद्यापही अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होमच करत आहेत. 3 / 9देशातील टेलिकॉम कंपन्यातील स्पर्धांचा बऱ्यापैकी फायदा युझरला होताना पाहायला मिळत आहे. कंपन्यांच्या अनेक आकर्षक प्लानमुळे कमी खर्चात चांगले बेनिफिट्स मिळत आहेत. यातच एका कंपनीने दिवसाला केवळ ७ रुपयांच्या खर्चात दररोज ५ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि मोठी वैधता देणारे प्लान आणले आहेत. 4 / 9BSNL कंपनी ग्राहकांसाठी अनेक भन्नाट प्लान्स ऑफर करते. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. वर्क फ्रॉम होममध्ये युजर्स जड मीडिया फाइल्स जलद अपलोड आणि डाउनलोड करण्यासाठी वैधता, भरपूर डेटा आणि जलद गती देणाऱ्या प्लान्सना प्राधान्य देतात.5 / 9तुम्ही असा प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा मिळेल, तोही कमी किमतीत, तर BSNL कडे तुमच्यासाठी खूप काही आहे. BSNL कंपनी युजर्सना 4G नेटवर्कशिवायही अनेक 4G प्रीपेड प्लान्स ऑफर करते.6 / 9BSNL चा ५९९ रुपयांचा प्लान हा वर्क फ्रॉम होम प्लान आहे. जो, ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच रोजची किंमत फक्त ७.१३ आहे. या प्लानसह, युजर्सना संपूर्ण वैधतेसाठी दररोज ५ GB डेटा मिळतो. देशातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरने असा कोणताही प्रीपेड प्लान ऑफर केलेला नाही. 7 / 9BSNL चा ५ GB डेटा वापरल्यानंतर, युजर्ससाठी इंटरनेटचा वेग ८० Kbps पर्यंत घसरतो. Zing च्या मोफत सबस्क्रिप्शनसह युजर्सना दररोज १०० SMS देखील मिळतात. याशिवाय, युजर्सना telco द्वारे १२ pm ते पहाटे ५ दरम्यान अमर्यादित मोफत हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. ज्यामुळे त्यांचा दिवसभराचा FUP डेटा प्रभावित होत नाही.8 / 9जर तुम्हाला कमी परवडणारे काहीतरी मिळवायचे असेल, तर तुमच्यासाठी STV_२९९ हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हे ३० दिवसांच्या वैधतेसह येते आणि युजर्सना दररोज ३ GB डेटा (FUP डेटा वापरल्यानंतर वेग ८० Kbps पर्यंत कमी केला जातो) आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दररोज १०० SMS BSNL च्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना मिळतात. या प्लानची डेली किंमत ९.९० रुपये आहे. 9 / 9गोष्टी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी, BSNL २४७ रुपयांचे व्हाउचर देखील ऑफर करते. जे ३० दिवसांच्या वैधतेसह आणि ५० GB एक-वेळ हाय-स्पीड डेटा एकाच वेळी वापरता येऊ शकते. या व्यतिरिक्त, युजर्सना BSNL ट्यून, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह इरॉस नाऊ मनोरंजन सेवांचे ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील मिळतात. या प्लानमध्ये रोजची किंमत ८.२३ आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications