BSNL च्या 30 दिवसांच्या सर्वात स्वस्त Plan नं वाढवलं Jio-Airtel चं टेन्शन! फक्त 16 रुपयांत एवढे सारे Benefits By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 2:15 PM1 / 7BSNL भारतातील आपल्या युजर्ससाठी सर्वात स्वस्त 30-दिवसीय प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. ज्या प्लॅनसंदर्भात आम्ही बोलत आहोत, तो प्लॅन केवळ 16 रुपयांमध्ये 30 दिवसांपर्यंत वैधता देतो. पण, या प्लॅनमध्ये कुठल्याही प्रकारची एसएमएस सेवा अथवा डेटाचा लाभ घेता येणार नाही. 2 / 7बीएसएनएलने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे, की ह प्लॅन '20 पैसे/मिनिटांचा ऑन-नेट कॉल + 20 पैसे/मिनिटांचा ऑफ-नेट कॉल' चार्ज करतो. जर आपण आपले बीएसएनएल सिम अॅक्टिव्ह ठेऊ इच्छित असाल, तर हे व्हॉईस व्हाउचर एक चांगला पर्याय ठरू शकते. याशिवाय BSNL जवळ इतरही अनेक प्लॅन्स आहेत.3 / 7BSNL चा 147 रुपयांचा प्लॅन - आपल्याला BSNL च्या 30 दिवसांच्या वैधतेसह एक ठोस आणि किफायतशीर प्लॅन हवा असेल तर, STV_147 हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण या प्लॅनमध्ये युजर्ससाठी डेटा आणि व्हॉईस कॉलिंग दोन्हींचाही समावेश आहे. 4 / 7147 रुपयांच्या या प्लॅनमध्ये, युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगशिवाय 10GB डेटा आणि BSNL ट्यूनही मिळते. या प्लॅनमध्येही एसएमएसचा कोणताही फायदा नाही. पण या प्लॅनमध्येही कुठल्याही प्रकारचे एसएमएस बेनिफिट्स नाहीत.5 / 7BSNL चा 247 रुपयांचा प्लॅन - आपण अधिक पैशांचा प्लॅन घेऊ शकत असाल तर, BSNL चा 247 रुपयांचा प्लॅनही बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना एसएमएसची सुविधाही मिळते. युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह 50GB डेटा, बीएसएनएल ट्यून्स आणि इरोस नाऊ एंटरटेनमेंट सर्व्हिससह दिवसाला 100 SMS देखील मिळतात.6 / 7BSNL चा 299 रुपयांचा प्लॅन - हे आणखी एक स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) आहे, हे आपण BSNL कडून मिळू शकता. या प्लॅनसह, युजर्सना रोज 3GB डेटा, अमर्याद व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला 100 SMS मिळतात. 7 / 7299 रुपयांच्या या प्लॅनची फेअर युसेज पॉलिसी (FUP) डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 80Kbps पर्यंत घसरतो. तसेच, व्होडाफोन आयडिया (व्हीआय), भारती एयरटेल आणि रिलायन्स जियो सारख्या टेलीकॉम ऑपरेटर्सनीदेखील 30 आणि 31 दिवसांच्या वैधतेसह असलेले प्रीपेड प्लॅन आणले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications