शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दररोज 2 ते 3 gb डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; पाहा BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 8:12 PM

1 / 7
BSNL Recharge Plan: खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio, Vi ने जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपल्या सर्व रिचार्जच्या किमती वाढवल्या, तेव्हापासून मोठ्या संख्येने ग्राहक भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) कडे वळत आहेत.
2 / 7
मागील काही दिवसांत BSNL च्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण BSNL चे स्वस्त दर आहेत. इतर खाजगी मोबाईल ऑपरेटरच्या तुलनेत BSNL खूप स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे.
3 / 7
BSNL ने एक उत्तम 4G प्लॅन लॉन्च केला आहे. 395 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमेटेड कॉलिंग, 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त 2399 रुपयांचा आहे. तर, रिलायन्स जिओचा 365 दिवसांचा प्लॅन 3599 रुपयांमध्ये आणि एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन ​3999 रुपयांचा आहे.
4 / 7
BSNL द्वारे ऑफर केलेला सर्वात स्वस्त प्लॅन 107 रुपयांचा आहे, ज्यात 35 दिवसांच्या वैधतेसह 3GB 4G डेटा आणि 200 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळते. याशिवाय, BSNL च्या 108 रुपयांच्या विशेष प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळतो.
5 / 7
BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता मिळते. 200 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांच्या वैधतेसह पहिल्या 18 दिवसांसाठी 2GB 4G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. तर, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 2GB डेटा मिळतो.
6 / 7
आता तुम्ही BSNL मध्ये सिम कार्ड पोर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 1900 वर एसएमएस पाठून मोबाइल नंबर पोर्ट करण्याची विनंती करावी लागेल.
7 / 7
यासाठी मेसेज बॉक्समध्ये 'PORT' टाइप करा आणि एका स्पेसनंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका. यानंतर तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला बीएसएनएल सेवा केंद्रावर जावे लागेल.
टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन