शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL ने देशभरात उभारले 15000 4G टॉवर्स, 5G बाबत दिली महत्वाची अपडेट..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 4:32 PM

1 / 7
BSNL: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर लाखो ग्राहक BSNL कडे वळत आहेत. या संधीचे सोने करण्यासाठी BSNL देखील देशभरात आपली सेवा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीच BSNL ने देशभरात 15,000 नवीन 4G टॉवर्स बसवले आहेत.
2 / 7
ग्राहकांना कमी खर्चात सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी BSNL देशभरात 4G टॉवर्स बसवत आहे. दरम्यान, BSNL ने देशभरात 15 हजाराहून अधिक 4G मोबाईल टॉवर्स बसवले असून, ते अॅक्टिव्ह झाले आहेत. कंपनीने आपल्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
3 / 7
ऑक्टोबर अखेरपर्यंत 80 हजार टॉवर्स आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत उर्वरित 21 हजार टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. म्हणजेच मार्च 2025 पर्यंत 4 जी नेटवर्कचे एक लाख टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. याच 4G टॉवर्सद्वारे 5G सेवाही दिली जाईल.
4 / 7
एवढंच नाही, तर कंपनीने आता देशात 5G सेवेची चाचणी सुरू केली आहे. या प्रयत्नांमधून बीएसएनएल देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने आपापल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किंमती 20-25 टक्क्यांनी वाढवल्या होत्या, ज्यामुळे यूजर्स नाराज झाले आहेत.
5 / 7
याचा फायदा बीएसएनएलने घेतला असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात लाखो नवीन ग्राहकांनी बीएसएनएलचे सिम खरेदी केले आहे.
6 / 7
दरम्यान, बीएसएनएलने आपली 5G सेवा देशात आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर 4G सेवा वेगाने पसरवण्याचे कामही केले जात आहे. भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच खुलासा केला होता की, पंतप्रधान मोदींनी BSNL ची 4G सेवा देशभरात विस्तारण्यासाठी मेड इन इंडिया उपकरणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.
7 / 7
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच बीएसएनएलच्या 5G नेटवर्कची चाचणी घेतली आणि त्याचा मदतीने यशस्वीरित्या पहिला व्हिडीओ कॉल केला. युझर्ससाठी ही सेवा लवकरच रोलआउट होऊ शकते असं मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन