शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पूर्वीपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा Reliance Jio चे प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 7:50 PM

1 / 6
रिलायन्स जिओ(Reliance Jio) आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सनी अलीकडेच त्यांचे प्रीपेड प्लॅन्स महाग केले आहेत. प्लॅन महाग झाल्यानंतर रिलायन्स जिओचे टॅरिफ चार्जेस 21 टक्क्यांनी महाग झाले आहेत. पण तरीही तुम्ही जिओचा प्रीपेड प्लान स्वस्तात खरेदी करू शकता.
2 / 6
तुम्ही Reliance Jio चा प्लान पूर्वीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला येथे संपूर्ण प्रक्रिया सांगत आहोत. रिलायन्स जिओ आपल्या तीन प्रीपेड प्लॅनसह JioMart महा कॅशबॅक ऑफर देत आहे.
3 / 6
यात तुम्हाला प्लॅन घेतल्यावर 20% चा कॅशबॅक दिला जातो. ही कॅशबॅक ऑफर कंपनीच्या 719 रुपये, 666 रुपये आणि 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह दिली जात आहे. यासाठी तुम्हाला JioMart महा कॅशबॅक सेक्शनमध्ये कोणताही एक प्लॅन निवडावा लागेल.
4 / 6
यानंतर तुम्हाला JioMart कॅशबॅक चेक बॅलन्सवर टिक करावे लागेल. येथे तुम्हाला JioMart कॅशबॅक शिल्लक आणि तुम्ही या व्यवहारासह जास्तीत जास्त रक्कम रिडीम करू शकता हे सांगितले जाईल. तुम्ही त्यात जास्तीत जास्त रिडीम रक्कम भरा.
5 / 6
रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्लॅनसह, 143.80 रुपयांची सूट दिली जात आहे. यासह, या प्लॅनची ​​किंमत जवळपास 575 रुपयांपर्यंत खाली आली आहे. यामुळे हा प्लॅन आधीच्या प्लॅनपेक्षाही स्वस्त होतो. या प्लानची आधी किंमत 599 रुपये होती.
6 / 6
या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. तुम्ही Rs 666 आणि Rs 299 च्या प्रीपेड प्लॅनवर देखील असे फायदे घेऊ शकता.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ