ByteDance is cutting jobs in India amid prolonged TikTok ban security seasong china apps
TikTok वर भारतात बंदी; ByteDance कडून कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 4:34 PM1 / 10चिनी सोशल मीडिया कंपनी ByteDance च्या सर्वात लोकप्रिय असलेल्या TikTok या अॅपवर सरकारनं गेल्या सहा महिन्यांपासून बंदी घातली आहे. तर दुसरीकडे आता यावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे आपली टीम कमी केली जाणार असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आहे.2 / 10माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार आज सकाळी १० वाजता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना एक ईमेल करण्यात आला. तसंच केवळ महत्त्वपूर्ण पदांवरील कर्मचारीच कायम राहणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 3 / 10टेकक्रंचनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं की कंपनी म्हणते भारत सरकारकडून TikTok ची भारतात पुन्हा केव्हा येऊ शकेल, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. अशा परिस्थितीत कंपनीकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला दिसत नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव TikTok सह अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.4 / 10बाईटडान्सचे अंतरिम जागतीक प्रमुख वॅनेसा पाप्पस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं आपली टीम छोटी केली जाणार असल्याचं सांगितलं. 5 / 10'जसं तुम्ही कल्पना करू शकता तसा सहजरित्या हा निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण टीम कोणालाही कंपनी सोडावी लागू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत होती. आम्ही आपले खर्चही कमी केले आणि बेनिफिट्सही सुरू ठेवले. सध्या आपले अॅप बंद आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकत नाही,' असंही त्यांनी नमूद केलं. 6 / 10आम्हाला भारतात पुन्हा सेवा कधी सुरू होईल याची बिलकुल कल्पना नव्हती. परंतु आम्हाला एक आशा होती, असंही पाप्पस म्हणाले. दरम्यान, किती कर्मचाऱ्यांना कमी केलं जाईल याची कल्पना अद्याप देण्यात आलीी आहे. TikTok चे भारतात २ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. 7 / 10TikTok चे काही कर्मचारी गेल्या काही कालावधीपासून नव्या संधीच्या शोधात आहेत. तर देशांतर्गत असलेली शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म्स त्यांना आपल्याकडे घेण्यास पाहत असल्याचं या क्षेत्रातील सूत्रांनी मिंटशी बोलताना सांगितलं. 8 / 10आमच्या प्लॅटफॉर्म येथील नियमाप्रमाणे आपलं कामकाज सुरूच ठेवणार आहे. आम्ही अॅपशी संबंधित सर्व समस्यांचं समाधान शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, असं इंडिया टुडे टेकशी बोलताना TikTok च्या प्रवक्त्यांनी सांगितलं. दरम्यान, अॅप पुन्हा बाजारात येईल का याबबात त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. 9 / 10सध्या व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा कंपनीचा कोणताही मानस नाही. कंपनीचं काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. सध्या केवळ TikTok वर बंदी घालण्यात आसी आहे. भविष्यात पुन्हा एकदा हे अॅप लाँच केलं जाईल, असा विश्वासही कंपनीनं व्यक्त केला. 10 / 10गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत आहोत. परंतु आता टीम कमी करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही. आम्हाला पुन्हा एकदा TikTok लाँच करण्याची संधी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त लाखो युझर्स, आर्टिस्ट, स्टोरी टेलर्स, एज्युकेटर्स आणि परफॉर्मर्सना सहकार्य करण्याची संधी आम्हाला मिळेल अशी आशा आहे, असंही कंपनीनं नमूद केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications