CES 2024 Awesome! Smartphone will change color as you say, charge in airच E-Color Shift by Infinix
भन्नाट! स्मार्टफोन तुमच्या म्हणण्याप्रमाणे रंग बदलणार, हवेत चार्ज होणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:22 AM1 / 6सीईएस २०२4 मध्ये सर्वच कंपन्यांनी आपापली उत्पादने लाँच करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ईन्फनिक्सदेखील आहे. कंपनीने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये E-Color Shift टेक्नॉलॉजी दाखविली आहे. याद्वारे स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलचा रंग बदलता येऊ शकतो. 2 / 6यासाठी कोणताही खर्च येत नाही. याचबरोबर कंपनीने एअर चार्ज आणि एक्सट्रीम टेम्प बॅटरी कॉन्सेप्ट डिव्हाईस देखील दाखविले आहेत. हे तंत्रज्ञान मोबाईलची संकल्पनाच बदलून टाकणार आहे. 3 / 6आजवर लोकांमध्ये वायरलेस चार्जिंगची क्रेझ होती. बऱ्याच लोकांकडे हे तंत्रज्ञान आजही नाहीय, अशातच इन्फिनिक्सने हवेत चार्जिंग करणारी टेक्नॉलॉजी आणल्याने भल्या भल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. 4 / 6रंग बदलण्यासाठी कंपनीने E Ink Prism 3 चा वापर केला आहे. याद्वारे युजर त्याचा फोन आरामात कस्टमाईज करू शकतो. यामध्ये बॅटरी देखील वापरली जात नाही. यात मायक्रोस्ट्रक्टरचा वापर केला जातो. ज्यामध्ये कलर पार्टिकल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज भारित असतात. यावर वेगवेगळे व्होल्टेज वापरल्याने इलेक्ट्रीक फिल्ड बदलत राहते. यामुळे कलर पार्टिकल पुढे सरकतात आणि वेगवेगळे रंग दिसू लागतात. 5 / 6कंपनीने एअर चार्ज आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर बॅटरी देखील सादर केली आहे. एअरचार्ज कोणतेही उपकरण वायरलेसपणे चार्ज करण्यासाठी मल्टी-कॉइल मॅग्नेटायझिंग रेझोनान्स आणि एडॉप्टिव अल्गोरिदम वापरते. हे उत्पादन 20cm पर्यंत आणि 60 अंशांच्या कोनात उपकरणे चार्ज करू शकते. 6 / 6एक्स्ट्रीम-टेम्प बॅटरी सादर करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, प्रचंड थंडी किंवा अतिउष्णतेमुळे बॅटरी निकामी होण्याची समस्या दूर होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅटरी -40 अंश सेल्सिअस तापमानात काम करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications