chat between whatsapp and facebook messenger could look like
आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज? By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 1:19 PM1 / 8सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) बरेच लोकप्रिय आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. कंपनीला वाटते की WhatsApp, Facebook Messenger आणि Instagram Direct Messages चे युजर्स आपापसांत मेसेज करू शकतात. 2 / 8कंपनीने अलीकडेच फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग सुविधा सुरू केली. आता फेसबुक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरला इंटीग्रेट करण्याचे काम करत आहे.3 / 8याबाबतचा खुलासा Alessandro Palluzi लीकस्टरने केला आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार कंपनीच्या Facebook Messenger अॅपमध्ये लपलेले कोड आहेत, जे अॅपमध्ये व्हॉट्सअॅप चॅट दाखवू शकतात. 4 / 8हे फीचर सर्वात आधी गेल्या वर्षी जुलैमध्ये पाहिले होते. हे आता काम करत नाही. लीकस्टरच्या म्हणण्यानुसार, ते रिव्हर्स इंजिनीअरिंग करून Facebook Messenger अॅपवरून व्हॉट्सअॅप युजर्ससोबत चॅट करण्यास सक्षम होते.5 / 8Paluzzi च्या म्हणण्यानुसार, आता तुम्ही इतर कोणत्याही व्हॉट्सअॅप युजर्ससोबत चॅट करू शकत नाही. फेसबुकच्या चॅट अॅपमध्ये सध्या व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्याची सुविधा नाही. चॅटचा इंटरफेस अगदी फेसबुकसारखा दिसत आहे.6 / 8या अॅपच्या चॅट बबलमध्ये व्हॉट्सअॅप युजर्ससाठी केलेल्या चॅटमध्ये एक छोटासा व्हॉट्सअॅप लोगो दिसतो. या लोगोवरून असे समजते की, चॅट व्हॉट्सअॅप युजरसोबत करण्यात आले आहे.7 / 8सध्या हे टेस्टिंग फीचर काढले गेले आहे. मात्र, असे मानले जात आहे की, येणाऱ्या काळात Facebook ट्रू क्रॉस-प्लॅटफॉर्म चॅटिंग व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरसाठी आणू शकते. कंपनी सध्या मल्टिपल डिव्हाइसवरील क्रॉस-डिव्हाइस मेसेजिंग अॅप फीचरवर काम करीत आहे.8 / 8नुकत्याच झालेल्या लीकनुसार, युजर्स लवकरच व्हॉट्सअॅप चॅट्स अँड्रॉइड किंवा आयफोन डिव्हाइसवर ट्रान्सफर करू शकतात. कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे. मात्र, हे फीचर कंपनी कधीपर्यंत जारी करेल, हे अद्याप समजू शकलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications