chinese hackers are targeting indian users through part time job message
अलर्ट! Whatsapp वर Part Time Job च्या नावाने चीनी हॅकर्सचा भारतीय युजर्सना गंडा; "या" आमिषाला नका भुलू By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 9:35 AM1 / 14व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना दिसत आहे. याच दरम्यान व्हॉट्सअॅपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे. 2 / 14व्हॉट्सअॅपसारखं लोकप्रिय मेसेजिंग अॅप सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. चीनी हॅकर्स भारतीय युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. पार्ट टाईम नोकऱ्यांचं आमिष दाखवून गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. 3 / 14दिल्लीतल्या थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय य़ुजर्सना व्हॉट्सअॅपवर विविध प्रकारचे मेसेज हे पाठवले जातात. ज्यामध्ये एक लिंक देखील देण्यात आलेली असते. 4 / 14मेसेजमधील लिंक ओपन करताच एका दिवसात 10 ते 30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपये कमवा असा मजकूर दिसतो. तसेच यासारखे पार्ट टाईम कामाशीसंबंधित दिशाभूल मेसेज पाठवले जातात आणि युजर्सना नोकरी आहे असं सांगून जाळ्यात ओढलं जातं आहे.5 / 14रिपोर्टनुसार, हॅकर्स हे वेगवेगळ्या नंबरवरून लिंक तयार करून पाठवत आहेत. जे ओपन केल्यावर पार्ट टाईम जॉबचं पेज ओपन केलं जातं. तेच पेज विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलं असून त्याच्या मदतीने युजर्सना गोंधळात टाकलं जातं. 6 / 14हा धक्कादायक प्रकार समोर येताच सायबरपीस फाऊंडेशनने ऑटोबॉट इंफोसेक प्रायव्हेट लिमिटेडसोबत मिळून याचा अधिक तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान यूआरएलसोबत छेडछाड करण्यात आली आल्याचं समोर आलं आहे. 7 / 14एक एरर कोड देखील समोर आली असून तो चीनी भाषेत आहे. त्यानंतर जेव्हा डोमेनचा तपास करण्यात आला तेव्हा तो चीनमध्ये रजिस्टर्ड असल्याचं समजलं. व्हॉट्सअॅप आपली पॉलिसी बदलत असतानाच हॅकिंगचा हा प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 14काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.9 / 14युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. जर कोणाकडे व्हॉट्सअॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून जॉइन करू शकतात.10 / 14रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगलवर सर्च करून पाहिल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 11 / 14जवळपास 1500 ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत. 12 / 14युजरचं प्रोफाईल पाहिल्यास गुगलने युजर्सचं प्रायव्हेट अकाउंट दाखवणं सुरू केलं आहे. यात युजर्सची प्रोफाईल इमेज आणि त्याच्या नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाईल पाहू शकतात. रिपोर्टनुसार, जवळपास 5000 प्रोफाईल आता सार्वजनिक आहेत. 13 / 14व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअॅपने आणलेल्या नवा पॉलिसीमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अनेकांनी तर या नव्या पॉलिसीचा धसका घेतला आहे.14 / 14व्हॉट्सअॅपने युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. व्हॉट्सअॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications