Coronavirus : Apple Maps देणार आता कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 2:04 PM
1 / 13 कोरोनामुळे आतापर्यंत 160,784 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,332,471 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 600,006 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 2 / 13 अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 3 / 13 कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. 4 / 13 देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. यातच आता अॅपल मॅप्सनेही पुढाकार घेतला आहे. 5 / 13 काही दिवसांपूर्वीच गुगलने कोरोना ट्रॅकर वेबसाईट लाँच केली आहे. लवकरच आता अॅपल मॅप्सवर कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती मिळणार आहे. 6 / 13 अॅपल मॅप्स अॅपमध्ये लवकरच कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती अपडेट करण्यात येणार असल्याचं अॅपलने नुकतच सांगितलं आहे. अॅपलने यासाठी एक पोर्टल लाँच केले आहे. 7 / 13 मॅप्सचे एक अपडेट जारी करण्यात येईल. त्यानंतर अॅपल मॅप्समध्ये कोरोना व्हायरसच्या चाचणी केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. 8 / 13 आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आणि रुग्णालयासाठी हे तयार करण्यात आले आहे. अॅपलच्या पोर्टलवर रुग्णालय आणि आरोग्य संस्था कोरोना व्हायरस चाचणीसाठी नोंदणी करू शकतील. 9 / 13 अॅपल मॅप्ससाठी काम करीत असलेली टीम याचा तपासणी करतील. त्यानंतर चाचणी केंद्राची अॅपल मॅप्स अॅपमध्ये अपडेट करण्यात येईल. 10 / 13 9टू5मॅकच्या एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, अॅपल मॅप्समध्ये कोरोना चाचणी केंद्राच्या नावाशिवाय मोबाईल नंबर आणि आरोग्य संस्थांसोबत रुग्णालयाची माहिती मिळेल. 11 / 13 चाचणी लॅब विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी कशी चाचणी होईल, याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हेही यामध्ये कळणार आहे. 12 / 13 चाचणी लॅब विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी कशी चाचणी होईल, याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हेही यामध्ये कळणार आहे. 13 / 13 चाचणी लॅब विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी कशी चाचणी होईल, याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हेही यामध्ये कळणार आहे. आणखी वाचा