Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:01 PM
1 / 15 वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 452,177 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 2 / 15 भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 9000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. 3 / 15 कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 4 / 15 जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 5 / 15 अमेरिकेच्या एका वैज्ञानिकाने एका सॉफ्टवेअरचा शोध लावला असून या सॉफ्टवेअरच्या मदतीने फक्त काही सेकंदात शरीरात लपून असणाऱ्या कोरोना व्हायरसची माहिती मिळणार असल्याचा दावा केला आहे. 6 / 15 बराथ नारायणन असं युनिव्हर्सिटी ऑफ डेटॉन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकाचं नाव असून त्यांनी शरीरात कोरोना असल्यास त्याचा शोध लावणारं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. 7 / 15 सॉफ्टवेअर कोड व्यक्तीची छाती स्कॅन करून शरीरात लपून बसलेल्या कोरोनाचा शोध घेऊ शकतं असा दावा नारायणन यांनी केला आहे. 8 / 15 शरीरात लपून बसलेल्या कोरोना व्हायरसबाबत सॉफ्टवेअर 98 टक्के बरोबर माहिती देण्यासाठी सक्षम असल्याचं देखील वैज्ञानिकाने म्हटलं आहे. 9 / 15 बराथ नारायणन यांनी कोरोना व्हायरसचा शोध घेणाऱ्या या सॉफ्टवेअरबाबत डेली मेलला एक ई-मेल करून त्याबाबत माहिती दिली आहे. 10 / 15 कोरोनासाठी तयार करण्यात आलेले हे खास सॉफ्टवेअर सामान्य एक्स रे स्कॅनिंग मशीनपेक्षा एकदम वेगळं आहे. आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या मदतीनेच तयार करण्यात आले आहे. 11 / 15 नारायणन गेल्या अनेक दिवसांपासून आर्टिफिशिल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर काम करत आहेत. कारण त्याच्या मदतीने डॉक्टर लवकर रुग्णांचा आजार ओळखून योग्य ते उपचार करू शकतात. 12 / 15 ब्रेस्ट कॅन्सर, मलेरिया, ब्रेन ट्युमर, डायबेटीस, निमोनियासारख्या आजारचं वेगाने निदान होण्यासाठी सॉफ्टवेअर कोडचा शोध लावला आहे. 13 / 15 संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. 14 / 15 कोरोनावरील उपचार करण्यात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 15 / 15 कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे या गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांनीही निर्मिती कित्येक पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी वाचा