Coronavirus : फेक न्यूजचं असं करा फॅक्ट चेक, जाणून घ्या व्हायरल गोष्टींमागचं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 7:36 PM
1 / 14 कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 5000 हून अधिक झाला असून 160 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14 वेगाने पसरणाऱ्या या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान घरबसल्या लोक सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह झाले असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 3 / 14 सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज, बातम्या, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोनासंदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत. 4 / 14 फेक मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं आवश्यक आहे. कारण फेक मेसेज पाठवणं महागात पडू शकतं. 5 / 14 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घ्या. 6 / 14 फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या फेक न्यूज ओळखणं आता सोपं झालं आहे. व्हायरल मेसेज, बातम्या, फोटो आणि व्हिडिओ फेक आहेत की खरे आहेत हे कसं ओळखायचं जाणून घेऊया. 7 / 14 सोशल मीडियावर व्हायरल बातमीची किंवा व्हिडिओची हेडलाईन तपासा. खोट्या बातम्यांच्या हेडलाईनमध्ये अनेकदा घोळ असतो. तसेच चुका असतात. 8 / 14 एखादा फोटो एडिट करणं आता सहज शक्य आहे. त्यामुळे व्हायरल गोष्टीतील फोटो आधी चेक करा. तो नीट लक्षपूर्वक पाहा. फेक न्यूजमध्ये प्रामुख्याने फोटोंचा चुकीचा वापर केलेला असतो. 9 / 14 फेसबुक, व्हॉट्सअॅपवर असंख्य गोष्टी या सातत्याने शेअर केल्या जात असतात. मात्र त्याचा सोर्स हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावरून त्या बातमीची सत्यता तपासता येते. 10 / 14 सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टी या बऱ्याचदा जुन्या असतात. फॅक्ट चेकमध्ये हे काही वेळा समोर येतं. त्यामुळे बातमी चेक करायची असेल तर तिची तारीख तपासा. 11 / 14 एखादी बातमी तुमच्याकडे आली तर सर्वप्रथम त्याची यूआरएल म्हणजेच लिंक चेक करा. लिंकवरून बातमी खरी आहे की खोटी हे ओळखता येतं. लिंकमध्ये अनेकदा स्पेलिंग चुकीच्या असतात. 12 / 14 व्हायरल झालेला मेसेज, बातमी, फोटो आणि व्हिडीओ खरा आहे की खोटा हे समजून घेण्यासाठी गुगलची मदत घ्या. गुगलवर त्यासंबंधी सर्च करून माहिती मिळवा. 13 / 14 कोरोनासंदर्भातील विविध गोष्टी या सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र एखादा मेसेज, बातमी, फोटो, व्हिडीओ हा फेक असू शकतो. 14 / 14 एखादा मेसेज इतरांना पाठवण्याआधी एकदा विचार करा. त्याची सत्यता तपासून घ्या. फेक न्यूजचं फॅक्ट चेक करा. आणखी वाचा