Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:50 PM
1 / 14 कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. 2 / 14 काही कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. 3 / 14 व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याच प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. युजर्सना कंपनीने खास व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर दिलं आहे 4 / 14 सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉल केले जात आहेत. मात्र अनेकदा नेटवर्कमुळे त्याची क्वॉलिटी खराब होते. व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया. 5 / 14 व्हॉट्सअॅपच्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी चांगलं आणि हायस्पीड नेटवर्क गरजेचं असतं. सेल्युलर नेटवर्कवर कॉल केल्यास अनेक समस्या येतात. 6 / 14 वाय-फाय कनेक्शन ट्राय करा. व्हॉईस कॉलची क्वॉलिटी सुधारण्यासोबतच वाय-फाय व्हिडिओ कॉलिंगची मजा आणखी वाढवतं. 7 / 14 कामासाठी अनेकदा कमी डेटा असताना व्हॉट्सअॅपचं काम करणं गरजेचं असतं. अशावेळी लो डेटा युजेस फीचरचं महत्त्व अधिक वाढतं. 8 / 14 व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये देण्यात आलेलं हे फीचर इनेबल म्हणजेच ऑन केल्यावर व्हॉट्सअॅपच्या कॉलची क्वॉलिटी ही कमी डेटामध्ये बेस्ट होते. 9 / 14 फोनमध्ये बॅकग्राऊंडला चालणारे अॅप्सही बऱ्याच वेळेस कॉलच्या खराब क्वॉलिटीला कारणीभूत असतात. फोनचा परफॉर्मन्स कमी करण्यासोबत ते कॉलची क्वॉलिटीही खराब करतात. 10 / 14 व्हॉट्सअॅपवर व्हॉईस अथवा व्हिडिओ कॉलिंग करताना नेहमी बॅकग्राऊंडला सुरू असणारे विविध अॅप्स सर्वप्रथम बंद करा. 11 / 14 फोनमध्ये ब्लूटूथ अथवा बॅटरी सेव्हर मोड ऑन असल्यास व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची बेस्ट क्वॉलिटी मिळत नाही. 12 / 14 व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर कॉल करण्याआधी ब्लूटूथ आणि बॅटरी सेव्हर मोड ऑफ करा. 13 / 14 सर्व टिप्स वापरून देखील व्हॉट्सअॅप कॉलची क्वॉलिटी सुधारत नसेल तर एकदा डिव्हाईस रिस्टार्ट करा. 14 / 14 फोन रिस्टार्ट केल्यावर व्हॉट्सअॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची मजा आणखी वाढेल आणि त्याचा आनंदही घेता येईल. आणखी वाचा