शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:34 PM

1 / 12
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 47 लाखांवर पोहोचला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
जगभरात कोरोनाने थैमान घातले मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
3 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. अशातच आरोग्याची काळजी घेणारा एक हटके रिस्टबँड आला आहे.
4 / 12
कोरोना व्हायरसपासून हा रिस्टबँड युजर्सचा बचाव करणार आहे. तसेच हात धुणे, मास्क वापरणे, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगची देखील हा आठवण करून देणार आहे.
5 / 12
कॅनडाच्या कंपनीनं हे रिस्टबँड तयार केला असून तो कोरोनाच्या या संकटात तो लोकांना सातत्याने सतर्क करणार आहे.
6 / 12
ऑफिस अथवा इतर ठिकाणी जर 2 व्यक्ती 6 फूटांपेक्षा कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ आल्या तर त्यांना हा बँड सावध करणार आहे. रिस्टबँडचा अलार्म वाजेल.
7 / 12
सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी लोकांना एकप्रकारचे रिमांइडर हवे आहे आणि हेच लक्षात घेत हे रिस्टबँड तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
8 / 12
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल मॅकडोनाल्ड यांनी कंपनीने आतापर्यंत असे दहा हजार रिस्टबँडची विक्री केल्याची माहिती दिली आहे.
9 / 12
द वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार, या रिस्टबँडची किंमत 100 डॉलर आहे. मे अखेरपर्यंत कंपनी या रिस्टबँडची शिपिंग सुरू करू शकते.
10 / 12
फोर्ड आधीपासूनच आपल्या कारखान्यात सॅमसँग स्मार्टवॉचसह प्रयोग करत आहे, जे कर्मचारी एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्यांना अलर्ट करतील.
11 / 12
बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये एका बंदरावर काम कराणाऱ्या काही लोकांना युरोपीयन कंपनीमार्फत हातात घालण्यासाठी एक विशेष उपकरण देण्यात आलं आहे, जे घड्याळाप्रमाणे दिसतं आणि त्यांना सावध करतं.
12 / 12
बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये एका बंदरावर काम कराणाऱ्या काही लोकांना युरोपीयन कंपनीमार्फत हातात घालण्यासाठी एक विशेष उपकरण देण्यात आलं आहे, जे घड्याळाप्रमाणे दिसतं आणि त्यांना सावध करतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञान