CoronaVirus Marathi News drdo develops mobile laptop currency sanitizing machine SSS
CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:48 AM1 / 14कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे2 / 14कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. 3 / 14कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 67152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2206 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.4 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.5 / 14देशातील काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. काही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.6 / 14कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो. 7 / 14आता काळजी करण्याचं काही गरज नाही कारण रोजच्या वापरतील फोन, पैसे यासह इतरही वस्तू या तंत्रज्ञानाच्या मदतीने सॅनिटाईज करता येणार आहेत. 8 / 14संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डिआरडीओने (DRDO) कोणताही संपर्क न करता फोन निर्जंतूक करणारे उपकरण विकसित केले आहे. 9 / 14डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत हे उपकरण तयार करण्यात आले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 10 / 14डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयुएस) असे या उपकरणाचे नाव ठेवण्यात आले आहे.11 / 14सर्व प्रकारचे फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा यासह काही वस्तू या उपकरणाच्या माध्यमातून निर्जंतूक करता येणार आहेत12 / 14या उपकरणाला एक प्रोक्झिमिटर सेन्सर बसवण्यात आले आहे. उपकरण सुरू केल्यावर ते स्वतः वस्तूंच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतं.13 / 14डीआरयुएस उपकरणात फोनसह इतरही वस्तू निर्जंतूक केल्या जातात. निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यावर उपकरण स्वतःहून स्लिप मोडमध्ये जातं. 14 / 14ही सर्व प्रक्रिया पूर्ण असताना मानवी संपर्काची गरज भासत नसल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications