CoronaVirus Marathi News rome airport testing smart helmet corona SSS
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 4:23 PM1 / 15जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे.2 / 15जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 329,735 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. 3 / 15जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,090,118 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,024,286 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 4 / 15जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.5 / 15कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. 6 / 15 हेल्मेटच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची माहिती मिळणार असल्याची अनोखी माहिती समोर आली आहे. 7 / 15इटलीमध्ये हे खास हेल्मेट तयार करण्यात आले असून त्याचा वापर सुरू झाला आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर बसविण्यात आला आहे. 8 / 15रोम विमानतळावर प्रवाशांचं स्कॅनिंग हे स्मार्ट हेल्मेट करणार आहे. 9 / 15कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे हेल्मेट तयार करण्यात आले आहे.10 / 15भन्नाट हेल्मेटद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर शरीरातील तापमानात होणारे बदल सांगणार आहे. 11 / 15विमानतळावर सुरक्षा अधिकारी स्मार्ट हेल्मेट घालून लोकांना स्कॅन करण्यासाठी उभे राहतील. 12 / 15हेल्मेटसमोर येऊन प्रत्येक प्रवाशाने आपला चेहरा दाखवायचा आहे. त्यानंतर हेल्मेटमधून शरीरातील तापमान स्कॅन केलं जाणार आहे.13 / 15 सात मीटर लांबपर्यंत उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरातील तापमान स्कॅन करण्याची या हेल्मेटची क्षमता आहे. 14 / 15रोम हे या हेल्मेटचा वापर करणारं युरोपातील पहिलं शहर आहे. 15 / 15चीन आणि इटलीतील इंजिनियर्सनी एकत्र येऊन हे हेल्मेट तयार केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - youtube) आणखी वाचा Subscribe to Notifications