Coronavirus tech tips for work from home SSS
वर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 4:26 PM1 / 11कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. 2 / 11ऑफिसमध्ये साधारण 8 ते 9 तास काम केलं जातं. मात्र घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया. 3 / 11भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.4 / 11घरातून काम करण्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या मदतीने घरबसल्या काम करणं सोपं होतं. 5 / 11ऑनलाईनचा जमाना असल्याने आता सर्वांकडे इंटरनेट असतेच. मात्र घरातून ऑफिसचं काम करण्यासाठी इंटरनेटचा चांगला स्पीड असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इंटरनेटचे उत्तम कनेक्शन असावे. 6 / 11संगणकावर काम करताना माऊसचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र लॅपटॉपवर काम करताना अनेकदा तो नसल्याने अडचण येते. त्यामुळे माऊस असणं महत्त्वाचं आहे. 7 / 11डेस्कवर काम करणाऱ्यांसाठी Laptop Riser ही गरजेची गोष्ट आहे. यामुळे स्क्रीन डिस्प्ले हा स्वच्छ आणि Higher दिसतो. 8 / 11घरातून काम करताना ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांसोबत कामासाठी संपर्क साधणं आवश्यक असतं. Slack आणि Google Hangouts च्या मदतीने संपर्क साधणे सोपे होते. 9 / 11काम करताना अनेक गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं. मीटिंगसाठी व्हिडीओ कॉल किंवा कॉन्फरन्स कॉल केल्यास काम करणं अधिक सोपं होईल.10 / 11घरातून काम करताना अनेकदा घरातील आवाजाचा त्रास होतो. त्यावेळी हेडफोन्स कानात घालून शांतपणे काम करता येतं. तसेच महत्त्वाचा व्हिडीओ पाहायचा असल्यास हेडफोन्स उपयुक्त ठरतात. 11 / 11ऑफिसमध्ये काम करताना वर्क स्टेशन देण्यात आलेलं असतं. मात्र घरी सोफा अथवा जमिनीवर बसून काम करावं लागतं. यामुळे काम करण्यासाठी योग्य जागा निवडा. आणखी वाचा Subscribe to Notifications