शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : चीनच्या 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातही कोरोनाला रोखणं शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 4:23 PM

1 / 16
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,03,459 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,46,803 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
2 / 16
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे.
3 / 16
चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच देश कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
4 / 16
चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला त्यानंतर जगात वेगाने त्याचा संसर्ग झाला. मात्र सध्या त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. चीन केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
5 / 16
चीनमधील परिस्थितीत सध्या बरीच सुधारणा झाली आहे. कोरोनाने जगभरात कहर केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला तेच तंत्रज्ञान भारताने वापरले तर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं.
6 / 16
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी चीनने कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला ते जाणून घेऊया.
7 / 16
चीनने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वात आधी कलर कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही सिस्टम स्मार्टफोन अ‍ॅपसारखं काम करते.
8 / 16
लोकांना त्यांच्या ट्रॅव्हल आणि मेडिकल हिस्ट्रीनुसार हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचेच क्यूआर कोड दिले जाते. त्यामुळे हे कलर कोड लोकांनी घरात राहायला पाहिजे की नाही किंवा त्यांना बाहेर फिरण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवतात.
9 / 16
चीनी सरकारने या सिस्टमसाठी अनेक चेकपॉईंट्स बनवले आहेत. या सर्व ठिकाणी लोकांची तपासणी केली जाते. यामुळे लोकांना देखील मदत मिळते.
10 / 16
लोकांना रंगाचा एक क्यूअर कोड दिला जातो त्यानुसार अनेक गोष्टी निश्चित केल्या जातात. या सिस्टमचा वापर चीनमधील 200 हून अधिक शहरांत याची करण्यात आला आहे.
11 / 16
चीनने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रोबोटचा वापर केला आहे. हे रोबोट हॉटेलपासून ऑफिसपर्यंत सर्व प्रकारची स्वच्छता करण्याचे काम करतात. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छता केली आहे. त्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्याचे काम देखील करतात.
12 / 16
चीनमध्ये रोबोटचा वापर हा मेडिकल सॅम्पल पाठवण्यासठी केला जात आहे. रोबोटला कोरोनाची लागण होत नाही त्यामुळे भारतातही रोबोटच्या मदतीने अनेक कामे करता येतील.
13 / 16
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी चीनने ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. भारतातही ड्रोन्सच्या मदतीने लोकांपर्यंत फेस मास्क आणि औषध पोहोचवण्याचं काम नक्की करता येईल.
14 / 16
ड्रोनच्या मदतीने कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य क्षेत्रात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येऊ शकते. फवारणी करण्यात आल्याने संसर्ग रोखण्यात मदत मिळाली. चीनप्रमाणे भारतातही द्रोणच्या मदतीने कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य आहे.
15 / 16
चीनने कोरोना ट्रॅक करण्यासाठी Face Recognition सिस्टमचा वापर केला. भारतही चीनप्रमाणे या सिस्टमचा वापर करू शकतो. या सिस्टममध्ये इंफ्रारेड डिटेक्शन तंत्रज्ञान बसवण्यात आले असून ते शरीराचे तापमान मोजण्याचे काम करते.
16 / 16
Facial Recognition System मध्ये कोणी मास्क घातला आहे किंवा कोणी मास्क घातला नाही याची देखील माहिती दिली जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञानchinaचीनIndiaभारतDeathमृत्यू