Coronavirus: Whats Up Number to Fight Rumors; Chatbot will answers hrb
Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 2:46 PM1 / 11सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांचा पाऊस पडत असताना अचूक माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.2 / 11सोशल मीडीयावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता. 3 / 11गोमूत्रापासून तुरटी, शेणापर्यंत कोरोनाला मारू शकतात अशा अफवा पसरल्या आहेत. 4 / 11या WhatsApp Chatbot चे नाव MyGov Corona Helpdesk असे ठेवण्यात आले असून तो सर्व युजरना उपलब्ध असणार आहे. 5 / 11यासाठी केवळ तुम्हाला हा नंबर कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. हा नंबर सेव्ह झाला की त्यावर तुम्हाला नमस्ते असा मेसेज पाठविला जाणार आहे. 6 / 11कोरोनाच्या अफवांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून त्यावर कोरनाची लक्षणे, कोरोना व्हायरस कसा पसरतो? त्याचे संक्रमण कसे कमी करायचे आदी प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. 7 / 11सर्वात आधी तुम्हाला 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्हा करावा लागणार आहे.8 / 11यानंतर तुम्हाला चॅटबोट प्रश्न पाठविणार आहे. त्यामध्ये A,B,C, D अशी उत्तरे द्यायची आहेत. कारण चॅटबोट हे रोबोच सॉफ्टवेअर असल्याने ते तुमची भाषा समजू शकत नाही.9 / 11यामुळे चॅटबोटला त्याला समजेल अशा अक्षरांच्या पर्यायाची उत्तरे पाठवावी लागणार आहेत. प्रत्येक मॅसेमध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबर, इमेल आणि युट्युब व्हिडीओची लिंक दिली जाणार आहे. 10 / 11यामध्ये तुम्ही कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. 11 / 11आयसीएमआरनुसार कोरोना व्हायरसचे भारतात २०६ रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण या आजारातून मुक्त झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications