शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो?, ‘या’ ट्रिक्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 4:17 PM

1 / 10
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे. मात्र स्लो इंटरनेट आणि लिमिटेड डेटाच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे. 
2 / 10
वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. डेटा लवकर संपल्यानंतर कंटाळा येतो. मोबाईलचा डेटा लवकर संपत असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या नक्की वापरा.
3 / 10
स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हर फीचर इनेबल करणं हा डेटा युजेस कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
4 / 10
फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डेटा सेव्हर सर्च करा आणि समोर असलेला टॉगल इनेबल करा
5 / 10
वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये बॅकग्राऊंडमध्ये वापरला जाणारा डेटा कंट्रोल करता येतो.
6 / 10
मोबाईल डेटा अँड वायफायवर टॅप करा. त्यानंतर Background Data डिसेबल करा.
7 / 10
जास्त डेटा खर्च होतो त्यामुळे स्ट्रीमिंग अ‍ॅपच सेटिंग बदला. 
8 / 10
अ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन mobile data usage मध्ये जाऊन save data पर्याय सिलेक्ट करा आणि डेटा सेव्हर ऑन करा.
9 / 10
 Whatsapp वर फोटो, व्हिडिओ आणि मीडिया फाईल्स डाऊनलोड केल्याने जास्त डेटा खर्च होतो.
10 / 10
Setting मध्ये जाऊन Data and storage usage वर टॅप करा. त्यानंतर ऑटो डाउनलोडमध्ये जाऊन when using mobile data पर्यायावर क्लिक करून डिसेबल करा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप