Cyber Security Hacking and Prevention Guide
'असे' राहा सावध; अन्यथा व्हाल हॅकिंगचे सावज By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 2:19 PM1 / 8स्मार्टफोनचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. ऑनलाईन शॉपिंगसह अनेक महत्त्वाचे व्यवहार हे आता झटपट मोबाइलवरून केले जातात. मात्र यामध्ये हॅकिंगचा धोका हा अधिक असतो. त्यामुळे हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.2 / 8MS Windows user असाल तर windows security साठी एका चांगल्या कंपनीच्या antivirus with internet security चा वापर करा. नेहमी paid antivirus चा वापर करा कारण free antivirus पूर्णपणे सुरक्षित नसतात. 3 / 8social media, online banking आणि विविध वेबसाईटसाठी वेगवेगळ्या पासवर्डचा वापर करा. अनेक जण पासवर्ड लक्षात राहावा यासाठी एकच पासवर्ड वापरतात मात्र हे धोक्याचे ठरू शकते. युनिक पासवर्ड तयार करा ज्यामध्ये upper case, lower case, special character, number यांचा समावेश असेल. common पासवर्डचा वापर करणं शक्यतो टाळा. 4 / 8आपल्या स्मार्टफोनवर अथवा मेलवर अनेकदा अनोळख्या नंबरवरून मेसेज अथवा मेल येत असतात. बऱ्याचदा हॅकर बँकेचा login password चोरण्यासाठी fake email पाठवतात. त्यामुळे अशा मेसेजवर अथवा मेलमधील लिंकवर पटकन विश्वास ठेवून क्लिक करू नका. बँकेने अशा पद्धतीचा मेल खरंच पाठवला आहे का याची आधी खात्री करा. 5 / 8स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेक जण दिवसातला बराचसा वेळ हा इंटरनेटवर घालवत असतात. त्याच दरम्यान काही व्हिडीओ, फोटो किंवा अन्य काही गोष्टी डाऊनलोड केल्या जातात. मात्र अशापद्धतीने डाऊनलोड करणं धोकादायक आहे. त्यामुळे App download करण्यासाठी केवळ trusted source चा वापर करा. 6 / 8काही websites व email service provider 2 step authentication चे security feature देतात. याचा वापर करून online account वर extra security layer add करता येतं. 2 step authentication मध्ये mobile number हा online account सोबत connect केला जातो. 7 / 8Microsoft वेळोवेळी os वर security update देत असतं. त्यामुळे आपला संगणक सुरक्षित राहण्यासाठी तो अपडेट ठेवा. antivirus application आणि database हे auto update वर set करा. smartphone वरील apps वर security update येत राहतात. त्यामुळे ते नेहमी अपडेट करा. 8 / 8सार्वजनिक वाय-फायचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. मात्र फ्री वाय-फायचा वापर करणं प्रकर्षाने टाळा. privacy आणि online security साठी हे नुकसानकारक ठरु शकतं. फ्री वाय-फायचा वापर केल्यास युजर्सची महत्त्वाची माहिती लीक होण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications