Different Use of Old Phones
जुन्या फोनचा असा करा भन्नाट वापर By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:23 PM1 / 11बाजारात सातत्याने नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन येत असतात. त्यावेळी अनेक जण फोन जुना झाला की नवीन फोन घेत असतात. जुना फोन विकण्याचा विचार केला तर त्यासाठी कमी पैसे मिळतात. त्यामुळे जुन्या फोनचा भन्नाट वापर कसा करायचा हे जाणून घेऊया. 2 / 11जीपीएसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नवीन जीपीएस डिव्हाईस घेण्यासाठी 10 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे जुन्या फोनलाच जीपीएस डिव्हाईस करा. 3 / 11कारच्या माऊंटला कनेक्ट करून त्याचा वापर करता येतो. यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी वाचेल. 4 / 11जुन्या फोनचा वापर हा डिजिटल फोटो फ्रेम म्हणून करता येतो. सर्व फोटो सेव्ह करण्यासाठी जुन्या फोनचा वापर करता येईल. 5 / 11फोन टीव्हीसोबत कनेक्ट करून मोठ्या स्क्रीनवर फोटो पाहता येतील.6 / 11पुस्तक वाचण्याची आवड असेल तर जुन्या फोनचा जास्त उपयोग होणार आहे. डिजिटल फॉर्मेटमध्ये आता पुस्तके उपलब्ध असतात. त्यामुळे ई-बुक रीडर म्हमून फोनचा वापर करता येईल.7 / 11गुगल प्ले स्टोरवर ई-बुक आणि लायब्ररीसाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत. 8 / 11मुलांना खेळण्यासाठी किंवा अभ्यासासाठी अनेकदा पालक नवीन फोन घेऊन देतात. नवीन फोन घेण्यापेक्षा जुन्या फोनमध्ये मुलांच्या कल्पकतेला वाव मिळेल असे गेम्स घ्या.9 / 11डिजिटल शिक्षण सध्या प्रचलित झालं आहे. मुलांच्या अभ्यासासाठी फोनचा योग्य वापर करा. 10 / 11जुन्या फोनचा वापर हा सिक्युरिटी कॅमेरा म्हणून ही करता येतो. जर पालक कामानिमित्त घराबाहेर असतील तर मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी ते जुन्या फोनचा वापर करू शकतात. 11 / 11आयपी वेब आणि मेनिथिंग अॅप यासाठी फोनमध्ये इन्स्टॉल करू शकता. सहजपणे या अॅपचा वापर करत येतो तसेच स्लो इंटरनेटवरही हे अॅप काम करतं. आणखी वाचा Subscribe to Notifications