शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त ७० रुपयांत पंखा फिरेल हेलिकॉप्टरसारखा...; स्पीड कमी झालाय तर हे करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 12:20 PM

1 / 9
जर तुमचा पंखा जुना झाला असेल त्यामुळे त्याचा वेग कमी होतो. त्याचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला आता फक्त ७० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
2 / 9
पंखा प्रत्येकाची गरज झाली आहे, आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकांनाच्या घरी पंखा नेहमी सुरू असतो. आता पंख्याला पर्याय म्हणून कुलरही बाजारात आले आहेत.
3 / 9
पण, पंख्यासारखी हवी कुलर देत नाही. त्यामुळे अनेकांची पसंती ही पंख्याला असते. मात्र पंखा जुना झाला तर तो हवा देणे कमी करतो. त्याची हवा कमी प्रमाणात लागते.
4 / 9
यासाठी आपल्याला पंखा बदलण्याचा सल्ला मिळतो, तर काहीजण आहे तो पंखा दुरुस्त करतात. यासाठी पुन्हा हजार, दोन हजार रुपये खर्च करावे लागतात. पण, आता एवढे पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त ७० रुपयात तुम्ही तुमच्या पंख्याचा वेग वाढवू शकता.
5 / 9
कमी हवेच्या समस्येमुळे उन्हाळ्यात चांगली हवा मिळत नाही. त्यामुळे याची अनेक कारणे असू शकतात. पंखा हवा कमी देण्याचे पहिले कारण पंखेचे ब्लेड धुळीने घाणेरडे असतात आणि त्यामुळे पंख्याद्वारे निर्माण होणाऱ्या हवेच्या अभिसरणावर गंभीर परिणाम होतो.
6 / 9
पंख्याचे ब्लेड साफ करण्यापूर्वी पंखा बंद करायला विसरू नका. पंखा बंद केल्यानंतर पंख्याचे ब्लेड अगोदर कोरड्या कापडाने आणि नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करावेत.
7 / 9
तुम्ही आधी ओले कापड वापरल्यास, सर्व धुळीचे कण पंख्याच्या ब्लेडला चिकटतील आणि पंखा व्यवस्थित साफ होणार नाही.
8 / 9
जर ही पद्धत वापरुन पंख्याचा वेग वाढला नसेल तर तुम्हाला आणखी एक पर्याय करावा लागेल. यात तुम्ही कॅपेसिटर वाढवून पंख्याचा वेग वाढवू शकता. साधारणपणे कॅपेसिटर ७०-८० रुपयांच्या दरम्यान येतो.
9 / 9
पंख्याला कॅपेसिटर बदलणे इतके अवघड नाही. तुम्ही ते स्वतःही बदलू शकता. जुने काढताना फक्त त्याची स्थिती तपासा आणि त्यानुसार बदला. अशाप्रकारे, कॅपेसिटर बदलल्याने, पंख्याचा वेग वाढेल.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान