शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चुकूनही WhatsApp Group वर 'हे' पाच मेसेज पाठवू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 5:08 PM

1 / 6
व्हॉट्सॲप हे एक असे मेसेंजर ॲप आहे, ज्यावर युजर्स जास्तीत जास्त वेळ घालवतात. व्हॉट्सॲप ग्रुप सर्वाधिक सक्रिय असतो. तुम्ही देखील तुमच्या दिवसातील बहुतांश वेळ व्हॉट्सॲप ग्रुपवर घालवत असाल तर तुम्हाला काही नियम माहित असणे गरजेचे आहे.
2 / 6
जर तुम्ही व्हॉट्सॲपवर ॲडल्ट कंटेंट शेअर करत असाल आणि ग्रुप मेंबरला काही आक्षेप असेल तर तो त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करू शकतो आणि तुमच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो.
3 / 6
जर तुम्ही बालगुन्हेगारीशी संबंधित मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ व्हाट्सॲपवर शेअर करत असाल. त्या आक्षेपार्ह असल्यास त्याची पोलीस तक्रार करता येते. यासाठी तुम्हाला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.
4 / 6
देशविरोधी भाषण आहे, असा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवला. तर तुम्हाला अडचण येऊ शकते. ग्रुप मेंबरला ते आवडले नाही तर पोलिसात तक्रार दाखल करु शकतो आणि याबद्दल तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
5 / 6
तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपवर हिंसक व्हिडिओ (किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारा) शेअर केल्यास, तुम्हाला ग्रुप सदस्य किंवा अॅडमिनच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनला जावे लागेल.
6 / 6
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एमएमएस आला आणि तो व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोणत्याही ग्रुप मेंबरने तक्रार पूर्ण केल्यास पोलीस तुमची चौकशी करू शकतात. तसेच, तक्रारही नोंदवली जाऊ शकते.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान