शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोटा ठेवता? होऊ शकतो मोठा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:27 IST

1 / 8
आपल्याकडे अनेकांना मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय असते. पण, उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने पैसे ठेवणे महागात पडू शकते. यामुळे आपल्या मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
2 / 8
उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणाहून मोबाईलचा स्फोट झाल्याची प्रकरण समोर येतात. तसेच एसी कॉम्प्रेसर आणि इतर इलेक्ट्रिकल गॅझेट्समध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या येत राहतात आणि या सर्व प्रकरणांमध्ये, स्फोटामागील सर्वात मोठे कारण म्हणजे उपकरणे आणि गॅझेट्सचा निष्काळजी वापर.
3 / 8
मोबाईलच्या कव्हरमध्ये फक्त नोटाच नाही तर काही जण त्यांचे मेट्रो कार्ड आणि महत्त्वाच्या स्लिप देखील मोबाईल कव्हरमध्ये ठेवतात पण या वाईट सवयींमुळे फोनचा ब्लास्ट होऊ शकतो.
4 / 8
उन्हाळ्याच्या हंगामात गॅझेट्स गरम होण्याची समस्या वाढू लागते, अशा परिस्थितीत, फोन कव्हरमध्ये नोटा किंवा इतर गोष्टी ठेवून, तुम्ही फोनमध्ये निर्माण होणारी उष्णता योग्यरित्या सोडू देत नाही.
5 / 8
यामुळे फोन जास्त गरम होऊ लागतो. जर जास्त गरम झाला तर स्फोट देखील होऊ शकतो.
6 / 8
चार्जिंगवर असताना फोन वापरल्याने फोनमध्ये जास्त उष्णता निर्माण होते. याशिवाय, जर फोन चार्जिंगवर असेल तर गेमिंग आणि कॉलिंगसह इतर कोणतेही काम करू नका, यामुळे फोन जास्त गरम होण्याची समस्या येऊ शकते.
7 / 8
मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही वस्तूमुळे एक अतिरिक्त थर तयार होतो यामुळे फोनमध्ये निर्माण होणारी उष्णता योग्यरित्या बाहेर येऊ शकत नाही आणि फोनचे तापमान वाढू लागते.
8 / 8
याशिवाय, मोबाईल कव्हरमध्ये कागद, नोट्स किंवा कार्ड यासारख्या वस्तू ठेवू नका. जर तुम्ही तुमच्या फोनसाठी जाड मोबाईल कव्हर खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की चार्जिंग करताना किंवा गेम खेळताना तुम्ही कव्हर काढून खेळत जा. यामुळे जास्त उष्णता निर्माण होऊ शकते.
टॅग्स :Mobileमोबाइल