शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WiFi राऊटर चालू ठेवल्यावर किती रुपयांची वीज खर्च होते माहितीये? पाहा संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 12:00 PM

1 / 7
हल्ली बहुतांश लोकांच्या घरी इंटरनेट हे असतंच. मग बरेचदा असं होतं की वीज गेली की वायफाय देखील काम करणं बंद करतं. वायफाय राऊटर चालवण्यासाठीही वीज लागतेच.
2 / 7
आजकाल घरून काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत इंटरनेटची गरज वाढली आहे. तुमच्या घरीदेखील वायफाय राउटर लावलेला असेल. तुम्ही कधी विचार केला आहे ते राऊटर किती वीज वापरतं?
3 / 7
वायफायचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल, वायफाय राउटर दिवस-रात्र चालूच असतो. अशा परिस्थितीत विजेचा वापरही वाढूतो. जर तुमचा राऊटर सतत सुरू असेल तर त्यासाठी किती वीज लागते हे आपण आज पाहणार आहोत.
4 / 7
वायफाय राउटरचा विजेचा वापर त्याच्या स्पेक्स, वापराचा वेळ आणि इतर घटकांवर अवलंबून असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामान्यत: भारतातील वाय-फाय राउटर वीज रेटिंग आणि वापराच्या पद्धतीनुसार प्रति तास ६ ते २० वॅट पॉवर वापरतो.
5 / 7
आता वायफाय राउटर एका दिवसात किती पॉवर वापरतो? हे शोधण्यासाठी, आम्हाला त्याचा प्रति तास वीज वापर आणि ते किती तास वापरले जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर राउटर सरासरी १० वॅट प्रति तास वापरत असेल आणि दिवसाचे २४ तास सतत वापरात असेल तर ७३० किलोवॅट वीज वापरली जाईल.
6 / 7
भारतातील विजेची किंमत राज्यानुसार बदलते. सरासरी, प्रति किलोवॅट तास वीजेचा खर्च सुमारे ७ ते १० रुपये आहे. विजेची किंमत ९ रुपये प्रति किलोवॅट तास असेल, तर दरमहा सुमारे ६५ रुपये वीज बिलात जोडले जातील. हे तुम्ही प्रति तास वीजेचा वापर*प्रति दिवस वापराचे तास = प्रतिदिवस ऊर्जेचा वापर अशाप्रकारे काढू शकता.
7 / 7

टॅग्स :Internetइंटरनेटelectricityवीज