Do you know these 'seven things' about Facebook?
फेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 5:23 PM1 / 7 फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहितीये का? फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला कलरब्लाइंडनेस आहे.फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे. 2 / 7फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला कधीही ब्लॉक करता येणार नाही.3 / 7फेसबुकचा वापर करोडो युजर्स करतात. दुनियेतील जवळपास प्रत्येक देशात फेसबुकचा वापर केला जातो. पण चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशात फेसबुक बॅन आहे.4 / 7आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलबद्दल आपण फेसबुकवर त्यासंबंधी रिपोर्ट करू शकतो. फेसबुक अशा प्रोफाइलला मेमोरलाइज्ड अकाऊंट करतं.ज्याचा वापर त्या मृताचं कुटुंबीय व मित्र करू शकतात. ही लोक मृत व्यक्तीच्या टाईमलाईनवर जाऊन काहीही शेअर करून जुन्या गोष्टी ताज्या करू शकतात. या अकाऊंटला कुणीही लॉग- इन करू शकत नाही. तसंच या अकाऊंटमध्ये कुठलाही बदल करता येत नाही. 5 / 7फेसबुकवर 'पोक' नावाचं एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ व उपयोग काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही. पण वास्तवातही यामागे काहीही अर्थ नाही. मार्क झुकरबर्गला फेसबुकमध्ये काहीही उपयोग नाही असं एक ऑप्शन हवं होतं. म्हणून त्याची निर्मिती झाली. 6 / 7फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येतं, त्याचं नाव आधी 'AWESOME' असं होतं. पण ते बदलून LIKE केलं गेलं7 / 7फेसबुकचा अतीवापर एका आजाराला निमंत्रण देत असतं. ज्याला फेसबुक अॅडिक्शस डिसऑर्डर असं नाव दिलं गेलं आहे. दुनियेतील करोडो लोक या आजाराने ग्रासले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications