Does anyone else read the private messages sent to the partner on WhatsApp? Check that
WhatsApp: व्हॉट्सअॅपवर पार्टनरला पाठवलेले प्रायव्हेट मेसेज इतर कुणी वाचत तर नाही ना? असं करा चेक By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 1:49 PM1 / 7व्हॉट्सअॅपवर सर्व चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसोबत येतात. मात्र काही वेळा कुणीही तुमचे मेसेज वाचू शकतो. आम्ही तुम्हाला असं तंत्र सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही प्रायव्हेट मेसेज, टेक्स्ट रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीशिवाय कोण वाचत आहे, याची माहिती घेऊ शकता. 2 / 7 तुम्ही आणि मेसेज रिसिव्ह करणाऱ्यांशिवाय तुमचे मेसेज कुणी अन्य व्यक्ती मेसेज वाचू शकतो, याचं कारण व्हॉट्सअॅपमधील काही फीचर्स आहेत. 3 / 7जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठल्या फिचरबाबत बोलतोय, तर व्हॉट्सअॅप वेब मल्टी-डिव्हाईस सपोर्टच्या माध्यमातून अनोळखी लोक तुमचे मेसेज वाचू शकतात. 4 / 7मल्टी-डिव्हाईस सपोर्टची एक मोठी फ्लिप साइट ही आहे की, त्यामुळे अनेक डिव्हाईसवर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉग-इन केल जाऊ शकतो. प्रायमरी अकाऊंट्स असलेले डिव्हाईस म्हणजे स्मार्टफोनवर इंटरनेट नसला तरी दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप चालेल. 5 / 7त्यामाध्यमातून अनेक डिव्हाइसेसवर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगइन केलं जाऊ शकते. प्रायमरी अकाऊंट असलेल्या डिव्हाईस म्हणजेच स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरी दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप चालेल.6 / 7तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप मेसेजला कुणी अन्य तर वाचत नाही ना, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरू करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये लिंक्ड डिव्हाइसेसच्या पर्यायावर जावं लागेल.7 / 7लिंक्ड डिव्हायसेसचा पर्याय सुरू केल्यानंतर तुम्हाला लिस्ट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं व्हॉट्स अॅप अकाऊंट किती डिव्हाईसवर लॉगइन आहे, म्हणजेच किती डिव्हाईसच्या माध्यमातून तुमचे मेसेज कुणी वाचत आह, त्याची लिस्ट दिसेल. त्यानंतर तुम्ही अनावश्यक डिव्हाइसमधून व्हॉट्सअॅपला लॉग आऊट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications