WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:53 IST
1 / 9व्हॉट्सअपवर अनेक फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. या अॅपवर स्कॅमर दररोज हजारो वापरकर्त्यांची फसवणूक करत आहेत. 2 / 9दरम्यान, सध्या एक नवीन घोटाळा वेगाने पसरत आहे, यामध्ये फक्त एक फोटो डाउनलोड केल्यानंतरही लोकांचे बँक खाते रिकामे होत आहेत. हे स्कॅमर 'स्टेगॅनोग्राफी' नावाच्या एका खास हॅकिंग तंत्राचा वापर करत आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत.3 / 9या प्रकारच्या हॅकिंग तंत्राचा वापर करून, महाराष्ट्रातील एका व्यक्तीला स्कॅमर्सने एका व्यक्तीची फसवणूक करुन बँक खात्यातून २ लाख रुपये काढले. 4 / 9२८ वर्षीय तरुणाने अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आलेला फोटो डाउनलोड केल्यानंतर २ लाखांहून अधिक रुपये बँक खात्यावरुन गेले. अनोळखी नंबरवरून मिळालेला फोटो एका वृद्ध व्यक्तीचा होता. हे स्कॅमर्सनी स्टेगॅनोग्राफी नावाच्या विशेष हॅकिंग तंत्राचा वापर करून तयार केले होते. त्यानंतर, त्या व्यक्तीने हा फोटो डाउनलोड करताच, त्याच्या बँक खात्यातून पैसे गेले.5 / 9हे लेस्ट सिग्निफिकंट बिट (LSB) स्टेग्नोग्राफी नावाच्या पद्धतीचा वापर करून केले. या प्रकारच्या घोटाळ्यात, स्कॅमर वापरकर्त्यांना धोकादायक कोड फोटो, ऑडिओ क्लिप किंवा अगदी पीडीएफ सारख्या मीडिया फाइल्समध्ये लपवून पाठवतात. 6 / 9या स्टेग्नोग्राफी फाइल्स अगदी सामान्य दिसतात पण त्यामध्ये मालवेअर लपलेले असते आणि फाइल उघडताच ते सक्रिय होतात.7 / 963SATS चे व्यवस्थापकीय संचालक नीहर पठारे यांनी सांगितले की, स्टेग्नोग्राफी सूचना अंमलात आणण्यासाठी फाइलमधील डेटाच्या सर्वात लहान बिट्समध्ये फेरफार करते.8 / 9हे फक्त विशेष फॉरेन्सिक साधनांचा वापर करून शोधले जाऊ शकते. यामुळे वापरकर्त्यांना आणि नियमित सुरक्षा सॉफ्टवेअर दोघांनाही धोका ओळखणे कठीण होते.9 / 9अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर तज्ञांनी सूचना दिल्या आहेत. यामध्ये अनोळखी नंबरवरून कोणत्याही मीडिया फाइल्स डाउनलोड करणे टाळणे, व्हॉट्सअॅपमधील ऑटो-डाउनलोड फीचर बंद करणे, डिव्हाइसला नवीनतम सुरक्षा पॅचसह अपडेट ठेवणे आणि कधीही ओटीपी शेअर न करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.