download aadhaar pan 10th marksheet dl rc by whatsapp use digilocker mygov chat box
आधार, पॅन कार्ड किंवा मार्कशीट; WhatsApp वर एका चुटकीसरशी करा डाऊनलोड! जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 4:19 PM1 / 8व्हॉट्सअॅपवर चॅटिंग किंवा व्हिडीओ कॉल करण्याव्यतिरिक्त तुम्ही घरबसल्या व्हॉट्सअॅपवरून आधार, पॅन कार्ड, दहावीची मार्कशीट यासारखी महत्त्वाची कागदपत्रे डाउनलोड करू शकलात तर कसे होईल. आपण आज अशाच एका पद्धतीची माहिती घेणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही या सर्व गोष्टी WhatsApp वर सहज डाउनलोड करू शकता.2 / 8WhatsApp ही एक अप्रतिम इन्स्टंट मेसेजिंग सेवा आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रमंडळींशी जोडलेले राहता असे नाही तर तुम्ही DigiLocker वर सेव्ह केलेली कागदपत्र देखील डाउनलोड करू शकता. MyGov हा एक चॅटबॉट आहे जो WhatsApp वर काम करतो. 3 / 8MyGov चॅट वापरण्यासाठी, 9013151515 हा नंबर सेव्ह करा आणि या नंबरवर 'हाय' किंवा 'डिजिलॉकर' किंवा 'नमस्ते' टाइप करून तो WhatsApp वर पाठवा. येथे युझर्सना त्यांची 'आधार' माहिती द्यावी लागेल आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP सबमिट करावा लागेल. यानंतर तुम्ही सेव्ह केलेले आधार कार्ड डिजीलॉकरमध्ये सहज डाउनलोड करू शकता. 4 / 8तुम्ही WhatsApp वरून 10वी आणि 12वीच्या मार्कशीट्स डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमची मार्कशीट डिजिलॉकरमध्ये सेव्ह केली असेल, तर तुम्ही ती MyGov चॅटवरून डाउनलोड करू शकता. ही सेवा विशेषतः CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. राज्य मंडळाचे विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स येथून देखील डाउनलोड करू शकतात, जर त्यांच्या बोर्डाच्या मार्कशीट आधीच डिजिलॉकरमध्ये फीड केल्या गेल्या असतील आणि सेव्ह केल्या असतील. (फोटो: twitter.com/digilocker_ind)5 / 8तुमचे डिजिलॉकर अकाऊंट तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरशी लिंक असेल तरच ही सेवा काम करते. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) च्या मूळ प्रतीशिवाय प्रवास करायचा असेल, तर प्रथम येथून DL आणि RC डाउनलोड करा.6 / 8यासाठी तुम्हाला फक्त MyGov चॅट ओपन करायचे आहे आणि DL आणि RC चा पर्याय शोधण्यासाठी Hi पाठवायचे आहे. त्यानंतर तुम्ही ते दोन्ही डाउनलोड करू शकता. (फोटो: स्पिनी आणि ऑटोकार)7 / 8तुम्हाला तुमचे कोविड लस प्रमाणपत्र ताबडतोब कोणत्याही ठिकाणी दाखवायचे असेल, तर तेही तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता. जर युझर्सचे डिजीलॉकर अकाऊंट लिंक केले असेल तर ते कोविड प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. 8 / 8MyGov वर जा आणि Hi पाठवून Cowin Certificate चा पर्याय पहा. तुम्ही कोविड लस प्रमाणपत्र पर्यायासह थेट डाउनलोड देखील करू शकता. (फोटो: फ्लायगोफर्स्ट) आणखी वाचा Subscribe to Notifications