शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोनच्या पॉवर बटणाचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:06 PM

1 / 9
फोन ऑन किंवा ऑफ करण्यासाठी फोनच्या पॉवर बटणाचा वापर केला जातो. मात्र फोन सायलेंट करण्यासाठी, रिस्टार्ट करण्यासाठी, कॉल कट अथवा रिसीव्ह करण्यासाठी पॉवर बटणाचा वापर केला जातो. फोनमध्ये लहान दिसणार हे पॉवर बटण अत्यंत उपयुक्त आहे. या पॉवर बटणाचे काही फायदे आहेत ते जाणून घेऊया.
2 / 9
फोनमधील पॉवर बटणाचा वापर हा कॉल कट अथवा रिसीव्ह करण्यासाठी केला जातो. मात्र यासाठी वेगळं अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही तर सेटींगमध्ये जाऊन एक ऑप्शन ऑन करणं गरजेचं आहे.
3 / 9
सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जाऊन Accsessebiltiy वर क्लिक करा.
4 / 9
क्लिक केल्यानंतर त्याखाली पॉवर बटण अँड कॉलचा एक पर्याय मिळेल. यावर क्लिक करून ते ऑन करा.
5 / 9
ऑन केल्यानंतर फोनच्या पॉवर बटणाने कॉल कट करू शकता.
6 / 9
अशाच पद्धतीने काही फोनमध्ये कॉल रिसीव्ह करण्याचा सुद्धा पर्याय देण्यात आलेला असतो.
7 / 9
यासाठी फोनच्या सेटींगमध्ये जाऊन Accsessebiltiy वर क्लिक करा.
8 / 9
क्लिक केल्यावर कॉल रिसीव्ह करण्याचा एक पर्याय मिळेल. इनेबल केल्यानंतर पॉवर बटण दाबताच फोन रिसीव्ह करता येईल.
9 / 9
स्मार्टफोनच्या पॉवर बटणाचा तुम्हाला अशा पद्धतीने वापर करायचा नसल्यास सेटींगमध्ये जाऊन निवडलेले ऑप्शन ऑफ करा.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान