शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electricity Bill Saving Tips: पठ्ठ्याने सॉल्लिड जुगाड लढवला! भरमसाठ लाईट बिल यायचे, वीजचोर कोण? घरात मीटर लावून पकडला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:13 AM

1 / 8
आजकाल विजेचे बिल एवढे येऊ लागले आहे की, एलईडी बल्बही फिके पडू लागले आहेत. लोकांना एलईडी बल्ब, ट्युबलाईट लावली तर विजबिल कमी होईल असे वाटत होते. तसेच फाईव्हस्टार एनर्जी सेव्हिंग रेटिंगची उपकरणे घेतली तर बिल कमी येईल असे वाटत होते. परंतू, एवढे बिल येऊ लागलेय की, आधीचेच ४०, ६०, १०० वॉटचे बल्ब चांगले होते एसे वाटू लागले आहे.
2 / 8
एका तरुणाच्या घरचे देखील वापर नसताना १२००-१४०० रुपये बिल येऊ लागले होते. कोरोनापूर्वी ३००-४०० रुपयांवर येणारे लाईट बिल अचानक १२०० रुपयांवर गेले होते. घरातील उपकरणेही तिच होती. मग एवढे बिल कसे काय येतेय, असा प्रश्न सतावू लागला होता. १२०० रुपये बिल म्हणजे दिवसाचे ६ युनिट वापर. घरात एलईडी बल्ब, टीव्ही, फोर स्टार रेटिंगचा फ्रिज, गिझर आणि चांगल्या कंपनीची वॉशिंगमशीन एवढेच साहित्य होते.
3 / 8
महावितरणचा मीटर फॉल्टी असेल म्हणून त्याने एमएसईबीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. तिथे नेहमीप्रमाणे तक्रार काही ऐकून घेतली गेली नाही. आमच्याकडे मीटर नाहीत, तुम्ही बाहेरून मीटर घेऊन या मग टेस्टिंग करू असे उत्तर देण्यात आले. तसेच पुढचे बिल १००० च्या वर येतेय का ते पहा असेही सांगण्यात आले. वारंवार चकरा मारल्यानंतर एका इलेक्ट्रीशिअनने एक आयडिया सांगितली.
4 / 8
मोठ्या सोसायटीत घर असल्याने वीज कोणी चोरत तर नाहीय ना? अशीही शंका होती. कारण मीटर खाली पार्किंगमध्ये असतात आणि तिथून कनेक्शनची वायर घरांत गेलेली असते. यामुळे मध्येच कोणी झोल केला तर कसे समजणार? असा प्रश्न होता. म्हणून तरुणाने घरातच आपला स्वत:चा मीटर बसविण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
आता हा मीटर बसवायचा तर खर्च आलाच. परंतू हा मीटर काही आपण बाहेर बसवतो तसा नाही. तर स्वस्तातला आहे. फक्त ३०० रुपये याची किंमत. आतल्या युनिटला हा मीटर जोडला गेला, त्यातून आलेली वीज घरात सोडली गेली. आता खरी गंमत होती.
6 / 8
घर मालकाला आता रिडिंग घ्यायची होती. त्याने मीटर चालू झाल्यापासूनची रिडिंग घेतली. फ्रिज चालूच होता. मिक्सर नेहमीप्रमाणे वापरला गेला. दिनक्रम सुरु झाला. गिझर लावला गेला, तिथे लाल लाईट सारखी पेटू लागली. वॉशिंग मशीन चालू केली तिथेही लाल लाईट सारखी पेटू लागली. चोर सापडला. ही दोन उपकरणे मिळून दिवसाला ३ युनिट वीज वापरत होती.
7 / 8
अनेकदा आपली घरातील उपकरणेच वीजेच्या अधिकच्या वापराला कारणीभूत असतात. अकारण आपण टीव्ही सुरु ठेवतो, अनेकदा गिझर बंद करण्यास विसरतो. ऑटो ऑफ आहे म्हणून तसाच चालू ठेवतो. परंतू गिझर वीज वापरतच राहतो. गिझरला ७ वर्षे झाली होती. तरुणाने चोर सापडताच लगेचच गिझर बदलला.
8 / 8
अनेकदा नाही तर अनेक घरांत फ्रिजची कुलिंगसाठीची एकच सेंटिंग लावलेली असते. उन्हाळ्यातही कुलिंगसाठी हाय सेटिंग, पावसाळ्यातही तिच आणि हिवाळ्यातही तिच. घरातील अन्य लोकांना याची माहिती नसते, परंतू आतमध्ये ० ते ५ असा नॉब असतो, त्यावर कमी -जास्तचे लिहिलेले देखील असते, त्यानुसार तुम्ही त्याची सेटिंग करा, वीज वाचते. चार्ज झाले तरी उपकरणांचे बटन सुरु ठेवू नका...
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई