electricity bill will become half Just change these 2 devices
Electricity Bill हजारात येतंय? फक्त हे 2 डिव्हाईस बदला; बिल आल्यासारखंही वाटणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 5:36 PM1 / 5खरे तर हिवाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. पण यातही, वीज बिल अधिक येण्याच्या भीतीने काही लोक विजेच्या वापरात काटकसर करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यालाही एक मर्यादा आहे.2 / 5अनेकवेळा आपण नकळत अशाही गोष्टी करतो, ज्यामुळे विजेचा गरज नसतानाही अधिक वापर होतो. पण काही गोष्टींची काळजी घेतली, तर वीज बिल अर्ध्यापेक्षाही कमी होऊ शकते. तर जाणून घेऊयात वीजबील कमी करण्याचे अगदी सोपे उपाय...!3 / 5वीजबिलात वाढ होण्याचा दुसरा अर्थ म्हणजे, महिन्याचे बजेट कोलमडणे. जर आपल्यालाही अधिकचे वीज बील येत असेल, तर घरात काही बदल करणे आपल्याला फायदेशीर ठरेल. वीजबिल कमी करण्यासाठी आपल्याला घरातील काही उपकरणे बदलावी लागतील.4 / 5LED Bulb चा वापर करा - जर आपल्या घरात जुने बल्ब असतील, तर ते त्वरित हटवा. जुन्या बल्बना अधिक वीज लागते. या बल्बऐवजी एलईडी बल्ब वापरू शकता. यामुळे तुमचा विजेचा वापर कमी होईल आणि वीजबिलही कमी येईल.5 / 5हीटर वापरणे टाळा - जर आपल्या घरात हाय कॅपॅसिटीचे हीटर लावलेले असतील तर ते त्वरित हटवा. कारण हाय कॅपॅसिटी असलेले हीटर अधिक वीज ओढतात. यामुळेवीज अधिक खर्च होते. हीटर ऐवजी आपण ब्लोअरचा वापर करू शकता. कारण याला हीटरच्या तुलनेत कमी वीज लागते. परिणामी वीजेचा वापर कमी होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications